AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SBI Alert: एसबीआयच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, दोन दिवस ‘या’ वेळेत बंद राहणार डिजिटल सेवा

SBI Bank | 10 आणि 11 ऑक्टोबर रोजी रात्री 11:20 ते 1:20 पर्यंत या सेवा उपलब्ध होणार नाहीत. या दरम्यान, UPI व्यवहार ग्राहकांसाठी बंद केले जातील. एसबीआयमध्ये योनोचे 3.45 कोटी नोंदणीकृत वापरकर्ते आहेत

SBI Alert: एसबीआयच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, दोन दिवस 'या' वेळेत बंद राहणार डिजिटल सेवा
एसबीआय बँक
| Edited By: | Updated on: Oct 10, 2021 | 7:13 AM
Share

नवी दिल्ली: भारतीय स्टेट बँकेत खाते असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. जर तुमचे देखील SBI मध्ये खाते असेल तर बँकेने तुमच्यासाठी अलर्ट जारी केला आहे. शनिवारपासून तीन दिवस बँकेची विशेष सेवा काही तास काम करणार नसल्याचे बँकेने जाहीर केले होते. बँकेने ट्विट करून ग्राहकांना याबाबत माहिती दिली होती.

या ट्विटमध्ये म्हटले होते की, तांत्रिक देखभालीसाठी बँकेच्या काही सेवा 09, 10 आणि 11 ऑक्टोबर रोजी बंद राहतील. या सेवांमध्ये इंटरनेट बँकिंग, योनो, योनो लाइट आणि यूपीआय सेवा समाविष्ट असतील. ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी वेळोवेळी बँकांकडून तांत्रिक सुधारणा केल्या जात असतात. जेणेकरून ग्राहकांना डिजिटल सुविधा अधिक सुलभपणे उपलब्ध होतील.

या वेळेत एसबीआयची सेवा बंद राहणार?

एसबीआयच्या माहितीनुसार या सेवा 09 ऑक्टोबरच्या रात्री 12:20 ते 02:20 पर्यंत बंद राहतील. 10 आणि 11 ऑक्टोबर रोजी रात्री 11:20 ते 1:20 पर्यंत या सेवा उपलब्ध होणार नाहीत. या दरम्यान, UPI व्यवहार ग्राहकांसाठी बंद केले जातील. एसबीआयमध्ये योनोचे 3.45 कोटी नोंदणीकृत वापरकर्ते आहेत आणि दररोज सुमारे 90 लाख लॉगिन केले जातात. डिसेंबर 2020 च्या तिमाहीत एसबीआयने योनोच्या माध्यमातून 15 लाखांहून अधिक खाती उघडली आहेत.

Visa कडून देशातील पहिली कार्ड टोकनायझेशन सेवा सुरू

डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म व्हिसाने गुरुवारी कार्ड ऑन फाईल (सीओएफ) टोकनायझेशन सेवा सुरू केली. हे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ताज्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आहे. सीओएफ टोकनायझेशनच्या मदतीने ग्राहकांचा डेटा सुरक्षित राहतो. व्हिसा कार्डने जुस्पेच्या भागीदारीत ही सेवा सुरू केली. सीओएफ टोकनायझेशन सेवा आता ग्रॉफर्स, बिग बास्केट आणि मेकमायट्रिप यांसारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेकडून मार्गदर्शक सूचना जारी

खरं तर सायबर हल्ले आणि डेटा चोरीच्या घटना लक्षात घेऊन भारतीय रिझर्व्ह बँकेने अलीकडेच एक मार्गदर्शक सूचना जारी केली होती. यानुसार कोणतीही ई-कॉमर्स कंपनी किंवा ऑनलाईन कंपनी तुमचा कार्ड डेटा सेव्ह करणार नाही. अशा परिस्थितीत वापरकर्त्यांना व्यवहारादरम्यान प्रत्येक वेळी कार्ड तपशील भरावा लागेल, यासाठी टोकनायझेशन संकल्पना राबवण्यात आली. व्हिसा हा पहिला कार्ड जारी करणारा आहे, ज्याने टोकनायझेशनसंदर्भात हे पाऊल उचलले.

संबंधित बातम्या:

LIC च्या या पॉलिसीत दिवसाला 233 रुपये गुंतवा, मॅच्युरिटीवेळी मिळवा 17 लाख रुपये

Petrol Diesel price: पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग चौथ्या दिवशी वाढ, जाणून घ्या इंधनाचा आजचा दर

Cryptocurrency मध्ये गुंतवणूक कशी कराल, जाणून घ्या एन्ट्री आणि एक्झिटची योग्य वेळ

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.