अवघ्या सात रुपयांत मिळणाऱ्या शेअरची किंमत झाली 718 रुपये, एका लाखाचे झाले 1 कोटी

Share Market | गेल्या सहा महिन्यांत वैभव ग्लोबलच्या शेअर्सवर खूप विक्रीचा दबाव आहे. मार्च 2021 पासून मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वैभव ग्लोबलचे शेअर्सचा भाव वाढत राहिला.

अवघ्या सात रुपयांत मिळणाऱ्या शेअरची किंमत झाली 718 रुपये, एका लाखाचे झाले 1 कोटी

मुंबई: सध्या शेअर बाजारात वैभव ग्लोबल (Vaibhav Global) या कंपनीच्या समभागाची प्रचंड चर्चा आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये Vaibhav Global कंपनीच्या समभागांनी गुंतवणुकदारांना 100 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. या समभागाने एका लाखाची गुंतवणूक केलेल्या लोकांना अक्षरश: कोट्यधीश केले आहे.

वैभव ग्लोबल ही एक डायमंड आणि ज्वेलरी कंपनी आहे. 10 वर्षांपूर्वी, 16 सप्टेंबर 2011 रोजी, NSE वर वैभव ग्लोबलच्या शेअर्सची किंमत 7.13 रुपये होती. हीच किंमत 17 सप्टेंबर 2021 रोजी 718 रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजेच वैभव ग्लोबलच्या शेअर्सचा परतावा या 10 वर्षात 100 पट झाला आहे.

गेल्या सहा महिन्यांत वैभव ग्लोबलच्या शेअर्सवर खूप विक्रीचा दबाव आहे. मार्च 2021 पासून मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वैभव ग्लोबलचे शेअर्सचा भाव वाढत राहिला. या दरम्यान, कंपनीचे समभाग 996.70 रुपयांवर पोहोचले होते. मात्र, यानंतर भरपूर प्रॉफिट बुकिंग झाले आणि समभागाची किंमत खाली आली.

यंदाच्या वर्षात 40 टक्के रिटर्न्स

गेल्या काही महिन्यांमध्ये गुंतवणुकदारांनी विक्रीचा सपाटा लावला असूनही वैभव ग्लोबल कंपनीच्या समभागाचा भाव 510.42 रुपयांवरून 718 रुपयांवर गेला आहे. याचा अर्थ यंदाच्या वर्षात कंपनीच्या समभागांनी 40 टक्के परतावा दिला आहे. गेल्या एक वर्षाचा कल पाहिला तर वैभव ग्लोबलचे शेअर्स 375.77 रुपयांवरून 718 रुपयांवर गेले आहेत. त्यानुसार या साठ्यांनी 91 टक्के परतावा दिला आहे.

गेल्या 5 वर्षांत, वैभव ग्लोबलच्या समभागाचा भाव 62.29 रुपयांवरून 718 रुपये इतका झाला. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 5 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये ₹ 1 लाख गुंतवले असते तर आज या गुंतवणुकीचे मूल्य साधारण 11.50 लाख रुपये इतके असेल.

जर आपण गेल्या 10 वर्षांचा रेकॉर्ड बघितला तर वैभव ग्लोबलच्या समभागाचा भाव 7.13 रुपयांवरून 718 रुपये इतका झाला आहे. या हिशेबाने जर एखाद्या गुंतवणूकदाराने 10 वर्षांपूर्वी वैभव ग्लोबल शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे मूल्य 1 कोटी झाले असते.

महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडच्या शेअर्सवर बंपर रिटर्न्स

सध्या शेअर बाजारात महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडच्या (MLL) समभागाची प्रचंड चर्चा आहे. गेल्या वर्षभरात या कंपनीच्या समभागांनी गुंतवणुकदारांना 192 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. 27 जुलै 2020 रोजी महिंद्रा लॉजिस्टिक्सच्या शेअरचा भाव 276.7 रुपये इतका होता. आता याच समभागाची किंमत 807.30 इतकी झाली आहे. याचा अर्थ वर्षभरापूर्वी एखाद्या गुंतवणुकदाराने महिंद्रा लॉजिस्टिक्सचे एक लाख रुपयांचे समभाग विकत घेतले असतील तर आता त्यांची किंमत साधारण 14.58 लाखांच्या घरात गेली आहे.

गुडलक इंडियाची वेगवान घोडदौड

यंदाच्या वर्षात शेअर बाजारात अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. यावेळी सर्वाधिक कमाई करून देणाऱ्या शेअर्समध्ये अनेक मिडकॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांचा समावेश आहे. गुडलक इंडिया (Goodluck India) हा देखील अशाच समभागांपैकी एक आहे. या इंजीनिअरिंग कंपनीच्या शेअर्सनी गेल्या वर्षभरात गुंतवणुकदारांना 400 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. या कंपनीच्या एका समभागाचा भाव 39.05 रुपयांवरून 194.90 रुपये इतका झाला आहे.

संबंधित बातम्या:

‘या’ कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणूकदार मालामाल; सहा महिन्यांत एका लाखाच्या गुंतवणुकीवर 7.65 लाख

अवघ्या 10 हजारांची गुंतवणूक; ‘या’ कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणूकदार पाच वर्षात झाले लखपती

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांनो 30 सप्टेंबरपर्यंत ‘हे’ काम आटपा, अन्यथा ट्रेडिंगला लागेल ब्रेक

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI