गेल्या 15 दिवसांमध्ये काय काय महागलं? LPG, पेट्रोल-डिझेल, खाद्यतेलांच्या वाढत्या दरांमुळं सर्वसामान्यांना झटका

गेल्या 15 दिवसांचा विचार केला असता बरेच काही महाग झाले आहे. या सर्व गोष्टी सामान्य लोकांच्या दररोजच्या जीवनाशी संबंधित आहेत. खाद्यतेलापासून पेट्रोल आणि डिझेलपर्यंतचा यामध्ये समावेश आहे.

गेल्या 15 दिवसांमध्ये काय काय महागलं? LPG, पेट्रोल-डिझेल, खाद्यतेलांच्या वाढत्या दरांमुळं सर्वसामान्यांना झटका
Gas Cylinder


नवी दिल्ली: गेल्या 15 दिवसांचा विचार केला असता बरेच काही महाग झाले आहे. या सर्व गोष्टी सामान्य लोकांच्या दररोजच्या जीवनाशी संबंधित आहेत. खाद्यतेलापासून पेट्रोल आणि डिझेलपर्यंतचा यामध्ये समावेश आहे. एलपीजी आणि सीएनजी-पीएनजीचे दर देखील महागले आहेत. देशात ज्या प्रकारे कोळशाचे संकट निर्माण झाल्याचं दिसत आहे त्याप्रमाणं विजेचे दर देखील वाढू शकतात.

गॅस सिलेंडर

आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या किंमती वाढल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी एलपीजीच्या किंमतीत प्रति सिलेंडर 15 रुपयांची वाढ करण्यात आली होती. तर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीही विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या. अनुदानित आणि विनाअनुदानित एलपीजीच्या किंमती वाढवण्यात आल्या. यासह जुलैपासून 14.2 किलो सिलिंडरच्या किमतीत एकूण 90 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सरकारी तेल कंपन्यांच्या मते, आता दिल्ली आणि मुंबईत एलपीजीची किंमत 899.50 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे. तर कोलकात्यात ते 926 रुपये आहे.

एलपीजी सिलिंडरची दरवाढ

सरकारने एलपीजीवरील सबसिडी बहुतेक शहरांमध्ये वेळोवेळी रद्द केली आहे. सामान्य कुटुंब, ज्यांना एका वर्षात प्रत्येकी 14.2 किलोचे 12 सिलेंडर सवलतीच्या दराने मिळतात आणि उज्ज्वला योजनेचे लाभार्थी ज्यांना मोफत कनेक्शन मिळतात, ते आता बाजारभावाच्या किमतीत सिलेंडर खरेदी करतात. 5 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत आता 502 रुपयांवर गेली आहे. जुलैपासून एलपीजीच्या किमतीत ही चौथी वाढ आहे. जुलै महिन्यात किमतीमध्ये 25.50 रुपये प्रति सिलेंडर वाढ करण्यात आली होती. यानंतर, 17 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी 25 रुपयांची वाढ करण्यात आली.

सीएनजी-पीएनजी दरवाढ

नैसर्गिक वायूच्या किंमतीत 62 टक्के वाढ झाल्यानंतर, शुक्रवारी दिल्लीत सीएनजी 2.28 रुपये प्रति किलो आणि घरांना पाईप केलेल्या स्वयंपाकाच्या गॅससाठी 2.10 रुपये प्रति किलो महाग झाले. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL) ने एका निवेदनात म्हटले आहे की, “नैसर्गिक गॅसच्या किंमती 62 टक्क्यांनी वाढवण्याबाबत जारी केलेल्या अधिसूचनेनंतर IGL ने CNG च्या विक्री किंमती वाढल्या आहेत. गॅसच्या उत्पादनाच्या किंमतीत वाढ झाल्याचा परिणाम कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आयजीएलच्या या निर्णयानंतर दिल्लीतील ग्राहकांसाठी सीएनजी 2.28 रुपये प्रति किलो आणि नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये 2.55 रुपये प्रति किलो महाग झाले आहे.

आयजीएलने 2 ऑक्टोबरपासून घरगुती पीएनजीच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील पीएनजीची ग्राहक किंमत 2.10 रुपये प्रति घन मीटरने वाढवून 33.01 रुपये प्रति एससीएम करण्यात आली आहे. त्याच नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये त्याची किंमत 32.86 रुपये प्रति एससीएम असेल. आयजीएलने सांगितले की, सीएनजी आणि घरगुती पीएनजीच्या किंमती वाढवण्याचा निर्णय नैसर्गिक वायूच्या किंमतीतील वाढ आणि महागड्या आर-एलएनजीवरील वाढत्या अवलंबनाचा प्रभाव कमी करण्यासाठी घेण्यात आला आहे.

पेट्रोल-डिझेलचा विक्रम

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींनी मंगळवारी सर्वोच्च पातळी गाठली. आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमती 2014 नंतरच्या उच्चांकी पातळीवर गेल्याने इंधनाचे दर पुन्हा वाढले आहेत. दोन दिवसांपूर्वी पेट्रोलच्या दरात 25 पैसे आणि डिझेलच्या दरात 30 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दरांनी सात वर्षांमधील उच्चांकी स्तर गाठल्याने भारतात इंधनाच्या दरात वेगाने वाढ होताना दिसत आहे. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे 29 पैसे आणि 35 पैशांची वाढ केली. पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा हा वेग पाहता सामान्यांना पुन्हा एकदा धडकी भरली आहे. मुंबईतील पेट्रोलचे दर 109.25 रुपये (0.29 पैशांची वाढ) तर डिझेलचा दर 99.55 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. त्यामध्ये 38 पैशांची वाढ झाली आहे. मुंबईत यामुळं डिझेलचा दर जवळपास शंभर रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.

एका आठवड्यात पेट्रोलच्या किंमतीत सातव्या वाढीसह, देशातील बहुतेक प्रमुख शहरांमध्ये या इंधनाची किंमत 100 रुपयांच्या पुढे गेली आहे. त्याचप्रमाणे, दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत नवव्या वाढीसह, मध्य प्रदेश, राजस्थान, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील अनेक शहरांमध्ये डिझेलची किंमत 100 रुपयांच्या वर गेली आहे.

खाद्यतेल महागलं

खाद्यतेलाच्या किंमती कमी होण्याऐवजी वाढत आहेत. मोहरीच्या तेलाची किंमत प्रति लिटर 200 रुपयांपेक्षा जास्त झाली आहे. कोणतेही तेल या दरापेक्षा जास्त नाही. सरकारनं पावले उचलूनही तेलाच्या किमती कमी होत नाहीत. मोहरी तज्ञांचे म्हणणे आहे की मोहरीचा साठा फक्त 18-20 लाख टन शिल्लक आहे. यासाठी एकही पर्याय नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेता सरकारने याबाबत निर्णय घ्यावा.

मोहरीच्या पुढील पिकासाठी अजून सुमारे पाच महिने बाकी आहेत आणि यावेळी मोहरीचे उत्पादन दुप्पटपेक्षा जास्त वाढू शकते. पण सुरुवातीच्या मोहरी पिकाच्या तेलाचा रंग हिरवा असतो. तज्ञांचे म्हणणे आहे की यावेळी सरकारने सहकारी संस्थांच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रमाणात मोहरी खरेदीची व्यवस्था करावी. गव्हाप्रमाणेच, सुमारे 10 लाख टन मोहरीचा कायम साठा राखला पाहिजे कारण मोहरी 10-12 वर्षे खराब होत नाही.

इतर बातम्या:

Petrol Diesel price : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाच्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव

Petrol Diesel price: खनिज तेलाने गाठली 7 वर्षांतली उच्चांकी पातळी, ‘या’ शहरात एक लीटर पेट्रोल 111 रुपये, डिझेलही शंभरीपार

Sharp price rise of lpg cylinder cng png petrol and diesel price hike in last 15 days

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI