वर्षाला 25 हजार रुपये गुंतवून मत्स्यशेतीचा व्यवसाय सुरु करा, सरकारकडून अनुदान, महिन्याला 2 लाखांची कमाई

Fish Cultivation | अशाच एका जोडधंद्यापैकी एक म्हणजे मत्स्यशेती. मत्यशेतीच्या व्यवसायात तुम्ही वर्षाला 25 हजारांची गुंतवणूक करून महिन्याला लाखो रुपयांचे उत्पन्न कमावू शकता.

वर्षाला 25 हजार रुपये गुंतवून मत्स्यशेतीचा व्यवसाय सुरु करा, सरकारकडून अनुदान, महिन्याला 2 लाखांची कमाई
मत्स्यशेती

मुंबई: तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल आणि एखादा व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही शेतीला पूरक असणाऱ्या व्यवसायात नशीब आजमवायला हरकत नाही. कारण, अलीकडच्या काळात पारंपारिक शेतमालाशिवाय आरोग्याच्यादृष्टीने अचानक महत्व प्राप्त झालेल्या पिकांची आणि उत्पादनांची मागणीही वाढली आहे. त्यामुळे शेतीसोबतच्या जोडधंद्यातून तुम्ही महिन्याला लाखो रुपये कमावू शकता.

अशाच एका जोडधंद्यापैकी एक म्हणजे मत्स्यशेती. मत्यशेतीच्या व्यवसायात तुम्ही वर्षाला 25 हजारांची गुंतवणूक करून महिन्याला लाखो रुपयांचे उत्पन्न कमावू शकता.

अनेक राज्यांमध्ये सरकार मत्स्य व्यवसायालाही प्रोत्साहन देत आहे. मत्स्य उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी छत्तीसगड सरकारने त्याला शेतीचा दर्जा दिला आहे. याशिवाय, राज्य सरकार मत्स्य उत्पादकांना बिनव्याजी कर्ज सुविधा देत आहे. यासोबतच सरकारकडून मच्छीमारांसाठी अनुदान आणि विमा योजनाही उपलब्ध आहे.

मत्स्यशेतीमधून कशाप्रकारे कमाई होईल?

जर तुम्हीही मत्स्यपालनाच्या व्यवसायात असाल किंवा तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर त्याचे आधुनिक तंत्रज्ञान तुम्हाला भरपूर नफा देऊ शकते. सध्याच्या काळात बायोफ्लोक तंत्र मत्स्यपालनासाठी खूप प्रसिद्ध होत आहे. अनेक लोक या तंत्राचा वापर करून लाखोंची कमाई करत आहेत.

बायोफ्लोक हे एका जीवाणूचे नाव आहे. यामध्ये मासे मोठ्या (सुमारे 10-15 हजार लिटर) टाक्यांमध्ये टाकले जातात. या टाक्यांमध्ये पाणी ओतणे, वितरीत करणे, त्यात ऑक्सिजन देणे इत्यादींची चांगली व्यवस्था आहे. बायोफ्लोक बॅक्टेरिया माशांच्या विष्ठेचे प्रथिनांमध्ये रूपांतर करतात, जे मासे परत खातात. त्यामुळे माशांच्या खाद्याच्या पैशात बचत होते. हे तंत्रज्ञान महाग असले तरी यामुळे तितकाच फायदाही मिळतो. राष्ट्रीय मत्स्य विकास महामंडळाच्या (NFDB) सल्ल्यानुसार जर तुम्हाला 7 टाक्यांसह तुमचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर त्यांना सेटअप करण्यासाठी तुम्हाला सुमारे 7.5 लाख रुपये खर्च करावे लागतील. मासे मोठे झाल्यावर ते बाजारात विकून तुम्ही पैसे कमावू शकता. हा व्यवसाय मोठ्या पातळीवर गेल्यास महिन्याला 2 लाखांचे उत्पन्न मिळू शकते.

मधमाशा पाळा आणि पैसे कमवा

शेतीला पूरक असणाऱ्या अशाच उद्योगांपैकी एक म्हणजे मधुमक्षिका पालन (Beekeeping Business). हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला फार भांडवल लागत नाही. यासाठी सरकारकडून आर्थिक अनुदानही दिले जाते. याशिवाय, मधुमक्षिका पालनाच्या व्यवसायातून तुम्ही महिन्याला अगदी पाच लाखांपर्यंतही उत्पन्न कमावू शकता.

तुम्ही किमान 10 पेट्या घेऊन मधुमक्षिका पालनाला सुरुवात करू शकता. जर प्रत्येक बॉक्समधून 40 किलो मध मिळाले तर 10 बॉक्समधून एकूण 400 किलो मध मिळते. प्रतिकिलो 350 रुपये दराने 400 किलो मध विक्री केल्यास 1 लाख 40 हजार रुपये कमाई होते. प्रत्येक बॉक्सचा खर्च 3500 हजार रुपये येतो. याप्रमाणे 10 बॉक्सचा एकूण खर्च 35 हजार रुपये होतो. म्हणजे यातून तुम्हाला 1,05,000 रुपये फायदा होतो. मधमाशांच्या संख्येत वाढ होईल तसा हा व्यवसाय तीन पटीने वाढतो. वातावरण आणि इतर घटक पोषक असतील तर तुम्ही वर्षभरात 25 ते 30 पेट्यांच्या माध्यमातून मधाचे उत्पादन घेऊ शकता.

मधमाशी पालनाचे अर्थशास्त्र त्याच्या दर्जावर अवलंबून असते. प्रत्येक डब्यातून प्राप्त होणारे 50 किलो कच्चा मध 100 रुपये प्रति किलोच्या दराने विकला जातो. म्हणजेच प्रत्येक डब्यामागे तुम्हाला 5 हजार रुपये मिळकत होते. मोठ्या प्रमाणात उद्योग केल्यास प्रति महिना 1 लाख 15 हजार रुपयांपर्यंत लाभ मिळू शकतो. जैविक मध चांगल्या किंमतीत बाजारात विकले जाते. एक किलो सेंद्रिय मधाचा दर 400 ते 700 रुपये आहे.

संबंधित बातम्या:

Drumstick Farming: एकदाच 50 हजाराची गुंतवणूक करा आणि दहा वर्षांपर्यंत खोऱ्याने पैसे कमवा

शेतकऱ्यांना सावकारांपासून वाचवणार, PNB बँकेचा पुढाकार, जाणून घ्या कर्जासाठी खास योजना

अगदी कमी भांडवलात सुरु करा व्यवसाय, सरकारकडून अनुदान; महिन्याला पाच लाखांची कमाई

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI