सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमात झाला बदल, 1 ऑक्टोबरपूर्वी करा हे काम
सुकन्या योजना नॅशनल सर्व्हीस स्कीम अंतर्गत अनियमित खात्यांना नियमित करण्याची प्रक्रीया सरु आहे. 1 ऑक्टोबरपासून या योजनेत काही बदल करण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही जर ही योजना कन्येसाठी सुरु केली असेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे.
देशात अनेक सरकारी बचत योजना आहेत. या सरकारी योजनात अनेक जण गुंतवणूक करीत असतात. जर आपल्या लाडक्या कन्येच्या भविष्यासाठी गुंतवणूक करायची आहे. तर सुकन्या समृद्धी योजना एक चांगला पर्याय आहे. जर तुम्ही या योजनेत गुंतवणूक केली असेल तर तुमच्यासाठी एक नवीन माहीती उपयोगी पडू शकते. 1 ऑक्टोबरपासून या सुकन्या समृद्धी योजनेचे नवीन नियम लागू होणार आहेत. जर तुम्ही या योनतेत गुंतवणूक केली असेल तर तुमच्यासाठी ही माहीती उपयोगाची आहे. सुकन्या योजना नॅशनल सर्व्हीस स्कीममध्ये एखाद्या कन्येचे खाते जर आजी आणि आजोबांनी उघडले असले तर त्या खात्याला अपडेट करणे गरजेचे आहे. काय आहे याची प्रक्रीया पाहूयात.
कायदेशीर पालकांचे नावे ट्रान्सफर करावे लागेल खाते
कन्य योजना नॅशनल सर्व्हीस स्कीमचे नियम बदलले आहे. या येत्या 1 ऑक्टोबरपासून या नियम लागू होणार आहे. जी खाती कायदेशीर पालकांनी उघडली नाहीत. त्यांना आता मुलीच्या आई-वडीलांच्या नावाने ही खाती ट्रान्सफर करावी लागणार आहे. म्हणजे कोणतेही खाते जर आजी -आजोबांनी उघडले असेल तर त्यांना ते मुलीच्या आई-वडीलांच्या नावे ट्रान्सफर करायला हवे. या नव्या नवीन गाईड्स लाईनच्या मते आई-वडीलच आता मुलीचे खाते खोलू शकणार आहेत किंवा बंद करु शकणार आहेत.
या कागदपत्रांची गरज
सुकन्या समृद्धी योजनेत आजी आणि आजोबांनी नातीच्या नावाने उघडलेली सुकन्या समृद्धी योजनेची खाती आता तिच्या आई – वडीलांच्या नावने स्ट्रान्सफर करावी लागणार आहेत. त्यामुळे आता काही कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. यात खाते पासबुक, मुलीचा जन्म दाखला, मुलीचे कायदेशीर पालक असल्याचा दाखला, पालकांचे ओळखपत्र, एप्लीकेशन फॉर्म, जुने खाताधारक आणि नवीन पालकांचे ओळखपत्र म्हणजे आजी-आजोबांचे आणि आई-वडीलांचे ओळख पत्र अशी कागदपत्रे लागणार आहेत.
अशी बदला कागदपत्रे
ज्या बॅंकेत सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडले आहे. तेथील शाखेत जावे लागणार आहे. वरील सर्वकागदपत्रे तेथे सादर करावी लागणार आहेत. बॅंक किंवा पोस्ट ऑफीस मधून तुम्हाला गार्डीयनशिप ट्रान्सफर फॉर्मवर सही घ्यावी लागले. या फॉर्ममध्ये आजी-आजोबा आणि आई – वडीलांची मागितलेली माहिती कागदपत्रात भरावी लागणार आहे. दोन्ही गार्डीयन फॉर्मवर सही करावी लागणार आहे. या सह तुम्हाला या फॉर्मला सर्व कागदपत्रे भरुन फॉर्मला पोस्ट ऑफीस किंवा बॅंकेत जाऊन जमा करावा लागणार आहेत. त्यानंतर पोस्ट कर्मचारी किंवा बॅंक कर्मचारी तुमची ट्रान्सफर रिक्वेस्ट रिव्ह्यू करतील आणि त्याची व्हेरीफीकेशन प्रोसिजर सुरु करतील. त्यानंतर आई-वडीलांच्या नावे हे खाते ट्रान्सफर होईल.