Tax Saving, FD की पोस्ट ऑफिस TD, ग्राहकांना कोणत्या डिपॉझिटवर अधिक व्याज? जाणून घ्या!

Bank FD Vs Post office TD: जर बँक एफडी आणि पोस्ट ऑफिस टीडीची तुलना करायची झाल्यास टाइम डिपॉजिट, हे बँकेच्या एफडीपेक्षा जास्त व्याज देते. या हिशोबानुसार ग्राहकांना पोस्ट ऑफिसच्या टीडी पेक्षा अधिक लाभ मिळेल.

Tax Saving, FD की पोस्ट ऑफिस TD, ग्राहकांना कोणत्या डिपॉझिटवर अधिक व्याज? जाणून घ्या!
Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 20, 2022 | 8:43 PM

टॅक्स सेविंग बँक, फिक्स डिपॉजिट (Tax saving bank FD) किंवा पोस्ट ऑफिसचे टाइम डिपॉजिट (Post office TD), ग्राहकांच्या दृष्टीने सर्वात जास्त फायदेशीर कोणते ठरते? असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. बहुतेक वेळा ग्राहक गोंधळलेल्या स्थितीत असताात. जेव्हा पैसे गुंतवायचे असतात, तेव्हा ग्राहकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात. आपला पैसा बँकेमधील एफडी मध्ये गुंतवावा की पोस्ट ऑफिस मधील टाईम डिपॉजिटमध्ये? हा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होतो. पोस्ट ऑफिस मधील टाईम डिपॉझीट हे सुद्धा बँकेतील एफडी प्रमाणेच असतं. त्याचा कालावधी वेगवेगळा असतो. पोस्टातील डिपॉझिट हे 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्षासाठी असते. या वर्षांनुसारच खाते उघडले जाते. ही दोन्ही खाती फिक्स डिपॉझिट (FD) सारखीच असतात. मात्र दोन्ही ठिकाणी मिळणारा परतावा हा वेगवेगळा असतो. त्यामुळे याबाबतचे व्याजदर जाणून घेणं महत्त्वाचंय.

टॅक्स सेविंग एफडी ही पोस्ट ऑफिस पेक्षा वेगळी असते. एफडी वरील टॅक्स वाचवण्यासाठी तुम्ही 1.5 लाख रुपये पर्यंत टॅक्स डिडक्शन मिळवू शकता. परंतु याची मर्यादा 5 वर्षाची असते. याआधी तुम्ही एफडी मोडू शकत नाही. पोस्ट ऑफिस टीडी वर्षभरासाठी देखील उघडू शकता.

बँक एफडी विरुद्ध पोस्ट ऑफिस टीडी

कोणत्या ठिकाणी आपल्याला भविष्यात फायदा प्राप्त होईल या गोष्टीचा आपल्याला व्याजा वरून अंदाज येऊ शकतो. 5 वर्षाच्या पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट वर आता 6.7 टक्के व्याज मिळत आहे. जर या व्याजाची बँकेच्या एफडी सोबत तुलना करायची झाल्यास आरबीएल बँक हल्ली 5 वर्षाच्या एफडीवर 6.3 टक्के व्याज देते.

कोणती बँक किती देत आहे व्याज ..

आरबीएल बँक नंतर आयडीएफसी बँकेचे पहिले नाव घेतले जाते.ही बँक सध्या 6.25 टक्के ने व्याज देत आहे. याच प्रकारे डीसीबी बँक आपल्या ग्राहकांना 5 वर्षाच्या एफडी वर 5.95 टक्के व्याज दर देत आहे. करुर वैश्य बँक हल्ली ग्राहकांना 5.8 टक्के आकर्षक व्याज दर देत आहे. या सर्व बँकेत एफ डी वर जास्त व्याज दर मिळत आहे. पोस्ट ऑफिस टीडी च्या तुलनेत कमी व्याज देत आहे. टॅक्स सेव्हिंग एफडीवर टॅक्स डीडक्शन्स बेनिफिट मिळते. पोस्ट ऑफिस ची गणना ही प्रत्येकी त्रिमासिक असते आणि त्याचे पेमेंट आपल्याला वर्षभराने करावे लागते.

एफडी आणि टीडी मध्ये काय असतो नेमका फरक ?

बँक एफडी चे व्याज प्रत्येकी महिने किंवा तीन महिन्याने मिळत असते. ग्राहकांची इच्छा असल्यास व्याजावरील पैसे ते पुन्हा गुंतवणुकीत टाकू शकतात. टॅक्स सेव्हिंग एफडी च्या व्याजातून मिळवलेल्या कमाईवर टॅक्स लागतो आणि ग्राहक इन्कम टॅक्स स्लॅब मध्ये येतो त्या नुसार टॅक्स जोडला जातो. जर तुम्हाला टीडीएस कापण्यापासून वाचायचे असेल तर बँक मधील फॉर्म 15G अवश्य भरायला हवा. टॅक्स सविंग एफडी मध्ये खूपच अडचण पाहायला मिळते कारण की पाच वर्ष आधी आपण ही एफडी मोडू शकत नाही.

जर बँक एफडी आणि पोस्ट ऑफिस टीडी बद्दल तुलना करायची झाल्यास टाइम डिपॉजिट हे बँक , एफडी पेक्षा जास्त व्याज देते.या पद्धतीने पाहायला गेल्यास ग्राहकांना पोस्ट ऑफिस च्या टीडी पासून जास्त लाभ मिळेल परंतु आपल्या आजूबाजूला असे ही काही बँका आहेत जे टॅक्स सेविंग एफडी वर ज्येष्ठ नागरिकांना सर्वसामान्य गुंतवणूक दार पेक्षा जास्त व्याज दर देते.

संबंधित बातम्या :

सोन्याच्या दरात प्रति तोळा चार हजारांची घसरण; गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले

अवघ्या 30 हजारात घरी न्या Bajaj Discover 150, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

गुंतवणूकदारांना Paytm चा धडा; आयपीओमधील गुंतवणूक पडली भारी, लाखो रुपयांना फटका

Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.