Gold, silver prices : सोन्याच्या दरात प्रति तोळा चार हजारांची घसरण; गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले
सोनं पुन्हा एकदा स्वस्त झाले आहे. सोन्याच्या किमतीमध्ये (Gold Price) तब्बल चार हजारांची घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) नुसार 24 कॅरेट सोन्याची किंमत 55,558 रुपये प्रति 10 ग्रामवरून घसरून 51,475 रुपये प्रति दाहा ग्रॅमवर आली आहे.
नवी दिल्ली : सोनं पुन्हा एकदा स्वस्त झाले आहे. सोन्याच्या किमतीमध्ये (Gold Price) तब्बल चार हजारांची घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) नुसार 24 कॅरेट सोन्याची किंमत 55,558 रुपये प्रति 10 ग्रामवरून घसरून 51,475 रुपये प्रति दाहा ग्रॅमवर आली आहे. शुक्रवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव 51,475 रुपयांवर बंद झाला होता. चालू आठवड्यात गुरुवार आणि बुधवार असे सलग दोन दिवस सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पहायला मिळाले. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धाचा परिणाम हा आतंरराष्ट्रीय बाजारपेठेवर झाला आहे. युद्धामुळे पुरवठा साखळी प्रभावित झाल्याने सोन्याच्या किमतीमध्ये सध्या तिव्र चढ उतार पहायला मिळत आहे. तज्ज्ञाच्या मते अमेरिकन रिझर्व्ह फेडने (US Fed Rate) व्याज दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी अमेरिकेने आपले व्याज दर 0.25 टक्क्यांनी वाढवल्याने त्याचा फटका हा सोन्याच्या किमतीला बसला असून, सोने तब्बल चार हजारांनी स्वस्त झाले आहे.
प्रमुख शहरातील सोन्याचे दर
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47,300 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 5,600 प्रति 10 ग्रॅम एवढा आहे. पुण्यात प्रति दहा ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,400 एवढा आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51700 एवढा आहे. नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 47380 आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर 51680 रुपये इतका आहे. चांदीचा दर प्रति किलो 68 हजार रुपये इतका आहे. दरम्यान सोन्याची खरेदी करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी सोन्याचे दर हे त्याची शुद्धता आणि दागिन्यांच्या डिजाईनवरून थोड्या-फार फरकाने कमी जास्त होऊ शकते.
सोन्यातील गुंतवणूक वाढली
दरम्यान दुसरीकडे रशिया आणि युक्रेन युद्धामुळे गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत होती. सोन्याचे भाव वाढत असल्याने गुंतवणूकदार सोन्यातील गुंतवणुकीकडे आकर्षित झाल्याचे पहायला मिळाले. गेल्या काही दिवसांमध्ये सोन्यामधील गुंतवणूक अचानक वाढली आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण होत असल्याने गुंतवणुकदारांची चिंता वाढली आहे.
संबंधित बातम्या
Bank of Baroda देतीये स्वस्तात घर खरेदीची संधी; 24 मार्चला बँकेकडून गहान संपत्तीचा लिलाव
जपानी कंपनी Suzuki Motor भारतात 1.26 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार, इलेक्ट्रिक वाहन निर्मितीला चालना
अवघ्या 30 हजारात घरी न्या Bajaj Discover 150, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर