जपानी कंपनी Suzuki Motor भारतात 1.26 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार, इलेक्ट्रिक वाहन निर्मितीला चालना

जपानी वाहन निर्माती कंपनी सुझुकी मोटर (Suzuki Motor) कॉर्पोरेशन इलेक्ट्रिक वाहन (electric vehicles) आणि बॅटरीच्या निर्मितीसाठी भारतात 1.26 अब्ज डॉलरची गुंतवणूक (Investment) करणार आहे. लवकरच कंपनीच्या वतीने गुजरातमध्ये बॅटरी निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे समोर आले आहे.

जपानी कंपनी Suzuki Motor भारतात 1.26 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार, इलेक्ट्रिक वाहन निर्मितीला चालना
जपानी कंपनी भारतात गुंतवणूक करणार
Follow us
| Updated on: Mar 20, 2022 | 8:07 AM

जपानी वाहन निर्माती कंपनी सुझुकी मोटर (Suzuki Motor) कॉर्पोरेशन इलेक्ट्रिक वाहन (electric vehicles) आणि बॅटरीच्या निर्मितीसाठी भारतात 1.26 अब्ज डॉलरची गुंतवणूक (Investment) करणार आहे. लवकरच कंपनीच्या वतीने गुजरातमध्ये बॅटरी निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे समोर आले आहे. यासाठी तब्बल 150 अब्ज येन म्हणजेच 1.26 डॉलर इतका खर्च येणार आहे. कंपनी भारतात अब्जावधीची गुंतवणूक करणार असून, त्यामुळे भारतातील इलेक्ट्रिक वाहन निर्मितीला चालना मिळेल असा दावा निक्केईच्या बिजनेस रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. पुढे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, भारत सरकार सध्या पर्यावरणपूरक वाहनांच्या निर्मितीवर भर देत आहे. देशात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढली तर वाहनापासून निर्माण होणाऱ्या प्रदूषणाला आळा बसेल. याच पार्श्वभूमीवर ही गुंतवणूक महत्त्वाची आहे. या गुंतवणूकीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यामध्ये चर्चा देखील झाल्याचा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. दरम्यान या गुंतवणुकीमुळे रोजगार वाढण्यास देखील मदत होणार आहे.

ऑक्टोबर 2019 मध्ये झाला होता करार

ऑक्टोबर 2019 मध्ये ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स पावर प्राईव्हेट लिमिटेड आणि जपान तोशीबा कॉर्पोरेशन यांनी मिळून गुजरात सरकारसोबत ऑक्टोबर 2019 मध्ये एक करार केला होता. या करारानुसार अहमदाबाद जिल्ह्यातील हंसलपूर परिसरात लिथियम -आयन बँटरीचा मोठा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी दोन टप्प्यात गुंतवणूक करण्याच्या करारावर सह्या झाल्या होत्या. त्यानंतर या प्रकल्पाबाबत पंतप्रधान मोदी आणि जपानचे पंतप्रधान यांच्यामध्ये देखील चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

रोजगारामध्ये वाढ

जपान भारतामध्ये विविध प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छूक आहे. त्याचाच एक भाग म्हणून जपानी वाहन निर्माती कंपनी सुझुकी मोटर (Suzuki Motor)कॉर्पोरेशन इलेक्ट्रिक वाहन (electric vehicles) आणि बॅटरीच्या निर्मितीसाठी भारतात 1.26 अब्ज डॉलरची गुंतवणूक (Investment) करणार आहे. हा प्रकल्प उभा राहिल्यास हजारो लोकांना रोजगार मिळणार आहे. सोबतच देशात इलेक्ट्रिक वाहनाची संख्या वाढल्यास पेट्रोल, डिझेलवरील अवलंबित्व कमी होऊन, प्रदूषणाला देखील आळा बसणार आहे.

संबंधित बातम्या

अवघ्या 30 हजारात घरी न्या Bajaj Discover 150, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

गुंतवणूकदारांना Paytm चा धडा; आयपीओमधील गुंतवणूक पडली भारी, लाखो रुपयांना फटका

‘आयकर’ची नजर या 700 क्रिप्टो गुंतवणूकदारांवर ; करचुकवेगिरी करण्यात यांच्याएवढे माहीर कोणीच नाही…

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.