RBI EMI : ईएमआयचं ओझं होणार कमी, आरबीआय खरंच देणार गोड बातमी?

RBI EMI : देशातील नागरिकांच्या डोक्यावरील ईएमआयचं ओझं लवकरच कमी होण्याची शक्यता आहे. RBI याविषयीची आनंदवार्ता लवकरच देऊ शकते...

RBI EMI : ईएमआयचं ओझं होणार कमी, आरबीआय खरंच देणार गोड बातमी?
Follow us
| Updated on: May 31, 2023 | 8:29 PM

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) देशातील नागरिकांना लवकरच दिलासा देऊ शकते. महागाईने जनता अगोदरच त्रस्त आहे. घरगुती गॅस सिलेंडरचे भाव हजार रुपयांच्या पुढे गेले आहेत. तर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत एक वर्षांपासून कसला ही दिलासा मिळालेला नाही. त्यातच महागाई (Inflation) आटोक्यात आणण्यासाठी केंद्रीय बँकेने रेपो दर (Repo Rate) वाढविण्याचा धडाका लावल्याने सर्वसामान्य हवालदिल झाले. ईएमआयमध्ये वाढ झाल्याने अथवा कर्जाचा कालावधी वाढल्याने कर्जदार चिंतेत होते. पण गेल्यावेळी आरबीआयने अचानक दिलासा दिला होता. आता कर्जदारांना आनंदवार्ता मिळू शकते.

रेपो दरात कपात भारतीय रिझर्व्ह बँकेने यावर्षी चौथ्या तिमाहीत रेपो दरात (RBI Repo Rate) कपात होऊ शकते. आता केंद्रीय बँक पुन्हा असाच दिलासा देण्याची शक्यता आहे, ऑक्सफोर्ड इकनॉमिक्सने हा अंदाज वर्तविला आहे. या जागतिक कंपनीने केलेल्या दाव्यानुसार, आरबीआय आता उदार धोरण स्वीकारु शकते. सध्या भारतात अनेक क्षेत्रातील आकड्यांनी महागाई आटोक्यात आणण्याचे उद्दिष्ट गाठले नसले तरी, त्यात मोठा दिलासा मिळाला आहे.

महागाईत नरमाई ऑक्सफोर्ड इकनॉमिक्सनुसार, महागाईत नरमाई आली आहे. ग्राहक निर्दशांकात दिलासा मिळाला आहे. 2023 मधील चौथ्या तिमाहीत आरबीआय पुन्हा व्याजदर कपात करु शकते, असा अंदाज वर्तविण्यात आला. महागाई कमी करण्याचे उद्दिष्ट अजून गाठता आले नसले तरी हे अंतर कमी झाल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यावर पतधोरण समिती (MPC) नक्कीच विचार करेल असे या जागतिक कंपनीला वाटते.

हे सुद्धा वाचा

कुठे कुठे दिलासा ऑक्सफोर्ड इकनॉमिक्सनुसार, परचेजिंग मॅनेजर इंडेक्सचे (PMI) आकडे, जीएसटी महसूल(GST Collection) किरकोळ महागाई दर (Retail Inflation) 4% पेक्षा कमी ठेवण्याचे लक्ष्य आहे. पण अजूनही महागाई, बेरोजगारी आणि इतर निर्देशांकात हवा तसा दिलासा मिळालेला नाही.

RBI चं लक्ष्य काय रिझर्व्ह बँकेने महागाई कमी करण्याची जबाबदारी खाद्यांवर घेतली आहे. महागाई दर 2 टक्क्यांच्या खाली आणि 6 टक्क्यांपेक्षा अधिक नसावा यासाठी आरबीआय धोरण आखते. महागाई दर 4 टक्क्यांपर्यंत असावा, हे सध्या आरबीआयचे लक्ष्य आहे. परंतु, त्यांचे लक्ष्य साध्य न करता आरबीआयने महागाई आटोक्यात आणण्याच्या कार्यक्रमाला ब्रेक लावला आहे.

250 बेसिस पॉईंटची वाढ भारतीय केंद्रीय बँकेने आतापर्यंत रेपो रेट दरात सहा वेळा वाढ केली आहे. ज्या दरावर इतर बँकांना आरबीआय उधार कर्ज पुरवठा करते, त्याला रेपो दर म्हणतात. मे 2022 पासून आतापर्यंत रेपो रेटमध्ये 250 बेसिस पॉईंटची वाढ झाली आहे. नवीन आर्थिक वर्षातील ही पहिली तर या वर्षातील दुसरी वाढ ठरेल. फेब्रुवारी महिन्यात आरबीआयने यापूर्वी रेपो दर 25 बीपीएसने वाढवला होता. पण त्यानंतर आरबीआयने रेपो दरात वाढ झाली नाही.

मनसे कार्यकर्ते ठाकरेंकडे येताच उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोमणा
मनसे कार्यकर्ते ठाकरेंकडे येताच उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोमणा.
राहुल नार्वेकर हेच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष, बिनविरोध होणार निवड
राहुल नार्वेकर हेच पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष, बिनविरोध होणार निवड.
EVMवर निवडून आलेल्या मविआच्या सर्वांनी राजीनामा द्या, कोणाचं वक्तव्य?
EVMवर निवडून आलेल्या मविआच्या सर्वांनी राजीनामा द्या, कोणाचं वक्तव्य?.
'सांगा काय चुकल?,' फडणवीसांच्या 'त्या' सल्ल्यावर शरद पवारांचा थेट सवाल
'सांगा काय चुकल?,' फडणवीसांच्या 'त्या' सल्ल्यावर शरद पवारांचा थेट सवाल.
'ते नेहमीसारखं उशीर...', शिंदेंच्या उशिरा येण्यावर दादांची टोलेबाजी
'ते नेहमीसारखं उशीर...', शिंदेंच्या उशिरा येण्यावर दादांची टोलेबाजी.
'किमान तुम्ही जनतेची दिशाभूल करू नका', फडणवीसांनी पवारांना दिला दाखला
'किमान तुम्ही जनतेची दिशाभूल करू नका', फडणवीसांनी पवारांना दिला दाखला.
सोमय्यांचा अभ्यास खोटा? अजितदादा DCM अन् दुसऱ्या दिवशी संपत्तीची वापसी
सोमय्यांचा अभ्यास खोटा? अजितदादा DCM अन् दुसऱ्या दिवशी संपत्तीची वापसी.
सोलापुरातील मारकडवाडी राजकीय केंद्र,शरद पवार ग्रामस्थांशी संवाद साधणार
सोलापुरातील मारकडवाडी राजकीय केंद्र,शरद पवार ग्रामस्थांशी संवाद साधणार.
फडणवीसांकडून मनसेला सोबत घेण्याचे संकेत, शिवसेनेची संमती की विरोध?
फडणवीसांकडून मनसेला सोबत घेण्याचे संकेत, शिवसेनेची संमती की विरोध?.
ग्रँड एन्ट्री पडली महागात, नवरदेवाच्या फेट्याला लागली आग, पाहा VIDEO
ग्रँड एन्ट्री पडली महागात, नवरदेवाच्या फेट्याला लागली आग, पाहा VIDEO.