Hundred Rupees Coin : 100 रुपयांचा कलदार! केंद्र सरकार आणतंय नाणं खासमखास 

Hundred Rupees Coin : 100 रुपयांचा कलदार लवकरच बाजार येणार आहे. काय खास आहे या नाण्यात, कशा निमित्त हे नाणं येत आहे बाजारात

Hundred Rupees Coin : 100 रुपयांचा कलदार! केंद्र सरकार आणतंय नाणं खासमखास 
Follow us
| Updated on: Apr 22, 2023 | 6:18 PM

नवी दिल्ली : आतापर्यंत तुम्ही 5 रुपये, 10 रुपये आणि 20 रुपयांचे शिक्के पाहिले असतील. आता तुम्हाला 100 रुपयांचा (Rs 100 Coin) शिक्का मिळेल. केंद्र सरकार लवकरच 100 रुपयांचा शिक्का बाजारात घेऊन येत नाही. त्यासाठीची तारीख ही निश्चित करण्यात येत आहे. हा शिक्का इतर नाण्यांपेक्षा वेगळा ठसा उमटवेल. केंद्र सरकारने (Central Government) यासाठीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार, केंद्रीय प्राधिकरणांतर्गत जारी करण्यात येणाऱ्या टांकसाळींमध्ये केवळ शंभर रुपयांची नाणी पाडण्यात येतील, तयार करण्यात येतील. केंद्र सरकार 100 रुपयांचे नाणे कधी जारी करणार, ते कसे दिसेल, त्यात काय खास आहे, असे अनेक प्रश्न आहेत, त्याविषयी जाणून घ्या.

कसा दिसेल 100 रुपयांचा शिक्का अधिसूचनेनुसार, 100 रुपयांच्या शिक्क्याचा गोलाकार 44 मिलीमीटर आहे. यामध्ये चांदी, तांबे, निकेल आणि जस्त एकत्र असतील. नाण्याच्या मागील बाजूस अशोक स्तंभ असेल आणि त्याखाली सत्यमेव जयते लिहिलेले असेल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. या 100 रुपयांच्या नाण्यावर मायक्रोफोन बनवला जाईल आणि त्यावर 2023 लिहिले जाईल. नाण्याच्या एका बाजूला भारत लिहिलेले असेल आणि दुसऱ्या बाजूला INDIA लिहिलेले असेल आणि वरच्या शीर्षकाखाली ₹ हे चिन्ह अंकीत असेल.

या दिवशी बाजारात येईल शिक्का पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेडिओवर ‘मन की बात’ (Mann Ki Baat) कार्यक्रमादरम्यान या नवीन शंभर रुपयांच्या नाण्याची माहिती दिली. या कार्यक्रमाचा लवकरच 100 वा भाग पूर्ण होत आहे. या निमित्ताने 100 रुपयांचा शिक्का जारी करण्यात येणार आहे. या शिक्क्यावर ‘मन की बात 100’ (Mann Ki Baat) असे लिहिलेले असेल. 30 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात 100’ कार्यक्रम होत आहे. त्यासाठी विशेष तयारी करण्यात येत आहे. त्यासाठी भारतीय जनता पक्ष एक लाखपेक्षा अधिक बुथवरुन या कार्यक्रमाचे थेट प्रसारण करणार आहे.

हे सुद्धा वाचा

असा असेल शिक्का पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रेडिओवरील ‘मन की बात’ हा कार्यक्रम 3 ऑक्टोबर 2014 रोजी, दसऱ्याला सुरु झाला होता. शंभर रुपयांचं हे नाणं 44 मिलीमीटर आहे. यामध्ये चांदी, तांबे, निकेल आणि जस्त एकत्र असतील. नाण्याच्या मागील बाजूस अशोक स्तंभ असेल आणि त्याखाली सत्यमेव जयते लिहिलेले असेल, असे सरकारने स्पष्ट केले आहे. या 100 रुपयांच्या नाण्यावर मायक्रोफोन बनवला जाईल आणि त्यावर 2023 लिहिले जाईल. नाण्याच्या एका बाजूला भारत लिहिलेले असेल आणि दुसऱ्या बाजूला INDIA लिहिलेले असेल आणि वरच्या शीर्षकाखाली ₹ हे चिन्ह अंकीत असेल.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.