Gold Silver Price Today News | बुधवारी सोन्या-चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today News) वाढ झाली. गेल्या दोन दिवसांपासून सोने उतरणीला लागले होते. तर चांदीही फिक्की पडली होती. सोन्याच्या किंमतीत 800 रुपयांपर्यंत प्रति 10 ग्रॅम घसरण झाली होती. तर मंगळवारी चांदीच्या किंमतीही 400 रुपयांनी घसरल्या होत्या. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेने (American Federal Reserve) व्याजदरात वाढ केलेली आहे आणि पुढील महिन्यात त्यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनेही रेपो दरात (Repo Rate) वाढ केलेली असून महागाई अटोक्यात आणण्यासाठी केंद्रीय बँक पुन्हा दरवाढ करण्याच्या तयारीत आहे. त्याचा परिणाम सोने आणि चांदीच्या किंमतींवर दिसून येण्याची शक्यता आहे. सोने आणि चांदीचे दर मध्यंतरी 50 हजारांच्या ही खाली उतरले होते. त्यानंतर गेल्या 15 दिवसांत हे दर वधरले आहेत.