UPI 123pay : आता फोनमधून पैसे पाठवण्यासाठी स्मार्ट फोनची गरज नाही; ‘असे’ पाठवा इंटरनेटविना पैसे

खेडे गावात साध्या फोनला डबडा फोन ही म्हणतात. तर अशा डबड्या फोनचे दिवस पालटले आहेत. या फोनमध्ये इंटरनेट चालत नाही, तरीही आता ग्राहकाला स्मार्टफोनसारखा व्यवहार करुन रक्कम हस्तांतरीत करता येणार आहे. भारतीय राष्ट्रीय देयके महामंडळाने UPI 123pay या सुविधेच्या माध्यमातून कॉल करा, पे करा ही सुविधा सुरु केली आहे.

UPI 123pay : आता फोनमधून पैसे पाठवण्यासाठी स्मार्ट फोनची गरज नाही; 'असे' पाठवा इंटरनेटविना पैसे
प्रातिनिधिक छायाचित्र
अजय देशपांडे

|

May 24, 2022 | 11:11 AM

UPI 123pay : खेडेगावात साध्या फोनला डबडा फोन ही म्हणतात. हा फोन केवळ संवाद साधण्यासाठी वापरता येतो. अथवा टेक्स मॅसेज पाठविण्यासाठी वापरतात. अगदी हजार-दोन हजारांच्या घरातील या फोनची क्रेझ स्मार्टफोनमुळे मागे पडली आहे. पण आता सरकारच्या प्रयत्नांमुळे या डबड्या फोनचे दिवस पालटले आहेत. या फोनमध्ये इंटरनेट चालत नाही, तरीही आता ग्राहकाला स्मार्टफोनसारखा व्यवहार करुन रक्कम हस्तांतरीत करता येणार आहे. त्यासाठी इंटरनेट सुविधा असलेले स्मार्ट फोनच (Smart Phone) असावाच याची गरज नाही. बटणांवर चालणा-या बेसिक फिचर फोनवरुन (Feature Phone) सुद्धा तुम्ही विना इंटरनेट पैसे पाठवू शकता. भारतीय राष्ट्रीय देयके महामंडळाने (NPCI) UPI 123pay या सुविधेचा शुभारंभ केला आहे. या सुविधेमुळे विना इंटरनेट तुमच्या साध्या फोनमधून सहजरित्या तुमच्या भाषेचा वापर करुन रक्कम पाठविता येणार आहे. कॉल करा, पे करा या सुविधेच्या माध्यमातून ग्राहकांना रक्कम पाठविता येणार आहे.

सुरक्षित व्यवहार

युपीआय 123 ही सुविधा पैसे हस्तांतरीत करण्यासाठी पुर्णतः सुरक्षित पद्धत आहे. यामध्ये दुस-या व्यक्तीला त्वरीत रक्कम त्याच्या खात्यात प्राप्त होणार आहे. सध्या ही सुविधा तुमच्या स्मार्टफोनवर इंटरनेटच्या सहाय्याने सुरु आहे. परंतू, ग्रामीण भागातही आर्थिक क्रांतीचे जाळे पोहचविण्यासाठी सरकारने विना इंटरनेट असलेल्या फिचर फोनवहही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. केवळ तीन पाय-यांचा वापर करत तुम्ही समोरील व्यक्तीच्या खात्यात रक्कम हस्तांतरीत करु शकता. या प्रक्रियेत सर्वात अगोदर कॉल करण्यात येतो आणि नंतर पर्याय निवडता येतो आणि सर्वात शेवटी रक्कम हस्तांतरीत करता येते.

रक्कम हस्तांतरीत करण्याची पद्धत

ग्राहकाला 08045763666 वा 6366200200 अथवा 08045163581 या क्रमांकावर तुमच्या फिचर अर्थात साध्या फोनवरुन कॉल करावा लागेल. त्यानंतर हस्तांतरणाचा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर युपीआय पिन टाकावा लागेल. त्यानंतर रक्कम अदा होईल. ही संपूर्ण प्रक्रिया चार टप्प्यात पूर्ण होईल. प्री-डिफांईड आयवीआर क्रमांक, मिस्ड कॉव पे, ओईएम इनेबल्ड पेमेंट आणि आवाजावर आधारित तंत्रज्ञानाच्या मदतीने युपीआय पेमेंट प्रक्रिया पूर्ण करता येईल. या प्रक्रियेत चुकीचा युपीआय पिन टाकल्यास तुमचा व्यवहार रद्द करण्यात येईल, तुमची रक्कम हस्तांतरीत करता येणार नाही. या प्रक्रियेत तुमची रक्कम खात्यातून वळती झाली तरी ती रक्कम लगेचच तुमच्या खात्यात जमा होईल.

हे सुद्धा वाचा

7 टप्प्यात रक्कम हस्तांतरणाची प्रक्रिया

  1. ग्राहकाला फिचर फोनवरुन संबंधित आयवीआर क्रमांक डायल करावा लागेल
  2. प्रथमच या सुविधेचा लाभ घेत असाल तर कॉल करतानाच त्याचे 123 पे प्रोफाईल तयार होईल
  3. खातेधारकाचे ज्या बँकेत खाते आहे, त्याची संपूर्ण माहिती द्यावी लागेल
  4. मोबाईल voice@psp च्या पद्धतीत ग्राहकाला दुस-या ग्राहकाचा युजर आयडी सांगितला जाईल
    डेबिट कार्ड अथवा खात्याची संपूर्ण माहिती जमा करुन युपीआय पिन निर्माण करावा लागेल. त्यासाठी फिचर फोनवर ओटीपी पाठविण्यात येईल.
  5. ग्राहकाला एक युपीआय क्रमांक तयार करण्यास सांगण्यात येईल. त्याचा वापर करुन रक्कम हस्तांतरीत करता येईल
  6. त्यानंतर ग्राहकाला व्यवहार पूर्ण करता येईल, पैसे पाठवण्यात येतील

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें