UPI Payment | अगदी कमी कालावधीत लोकप्रिय झालेल्या युपीआय पेमेंटवर (UPI payments) शुल्क आकारण्याचा प्रस्ताव भारतीय रिझर्व्ह बँकेने ठेवला होता. त्यावरुन देशात वाद झाला आणि लोकांनी या प्रस्तावावर नाकं मुरडली. सुट्टे पैसे ठेवण्याची झंझट नसल्याने आणि अगदी गल्लीत आलेल्या भाजी विक्रेत्यापासून ते एखाद्या बड्या हॉटेलमध्ये बिल अदा करण्यापर्यंत युपीआय बहुउपयोगी पडत आहे. त्यातच केवळ एक कोड स्कॅन करुन सहज पैसे चुकती करण्याची सोय असल्याने भारतीय जनतेने या युपीआय पेमेंट अॅपवर (UPI payments App)उड्या टाकल्या. पण त्यावर शुल्क (Charges) आकारणीचा प्रस्ताव जनतेच्या पचनी पडला नाही. यावर प्रसार माध्यमातून उलटसूलट चर्चा रंगल्याने अखेर केंद्रीय अर्थ मंत्रालयाने (Finance Ministry) तातडीने यासंबंधीची सरकारची भूमिका स्पष्ट केली. अर्थमंत्रालयाने काय भूमिका मांडली? त्यातून तुमचा फायदा होणार की तुमच्यावर शुल्काचा बोजा पडणार, पाहुयात.