Chiller | सुट्या पैशांचा त्रास कशाला राव..विना इंटरनेट दणदण करा पेमेंट..

Chiller | सुट्या पैशांमुळे व्यवहार पूर्ण करता येत नसेल तर त्यावर एक झक्कास उपाय आहे. विना इंटरनेट तुम्ही रक्कम अदा करु शकता..

Chiller | सुट्या पैशांचा त्रास कशाला राव..विना इंटरनेट दणदण करा पेमेंट..
इंटरनेटविना पेमेंटImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 21, 2022 | 5:17 PM

नवी दिल्ली : तुम्हीही बाजारात (Market) जाताना सुट्या पैसे सोबत ठेवता का? सुट्या पैशांवरुन (Chiller) आजही तुम्हाला मनस्ताप होतो का? तर आता हा त्रास होणार नाही. कारण त्यावर एक झक्कास उपाय आला आहे. विना इंटरनेट (Without Internet) तुम्हाला रक्कम अदा करता येणार आहे..

तर आता युपीआय लाईट (UPI Lite) तुमची ही चिंता मिटवणार आहे. पेटीएम, गूगल पे, फोन पे इतर युपीआय अॅप प्रमाणेच हा लाईट पर्याय तुमची सुट्या पैशांची काळजी संपवणार आहे. तुम्हाला सहज कुठेही रक्कम हस्तांतरीत करता येणार आहे.

छोट्या रक्कमांचे व्यवहार या माध्यमातून पूर्ण करता येतील. तसेच यासाठी इंटरनेटचीही गरज नसेल. तुम्हाला केवळ अॅप उघडायचं आणि पेमेंट करायचे आहे. या अॅपच्या मदतीने तुम्हाला छोटे-छोटे व्यवहार करणे सोपे होणार आहे.

हे सुद्धा वाचा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी 20 सप्टेबर 2022 रोजी युपीआय लाईट अॅप दाखल केले आहे. या ई-वॅलेटच्या मार्फत तुम्ही 200 रुपयांपर्यंतचा व्यवहार विना पिन करु शकता.

युपीआय लाईट पेमेंटच्या माध्यमातून तुम्ही संबंधित व्यवहार पूर्ण करु शकता. त्यासाठी तुम्हाला पिन टाकण्याची गरज नसते. ही रक्कम थेट समोरच्याच्या खात्यात वळती होते. तर तुम्हाला कोणी रक्कम दिली तर तो पैसा थेट तुमच्या खात्यात जमा होतो.

युपीआय लाईट अॅप हे एक डिव्हाइस वॅलेट आहे. यामध्ये तुम्हाला रक्कम जमा करता येते. छोटे छोटे व्यवहार या अॅपच्या माध्यमातून पूर्ण करता येतात. यासाठी इंटरनेटची गरज पडत नाही.

या पेमेंट अॅपमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त 2000 रुपये जमा ठेवता येतात. तर 200 रुपयांपर्यंतची रक्कम तुम्हाला अदा करता येईल. त्यापेक्षा मोठ्या रक्कम अदा करता येणार नाही. त्याची मर्यादा ठरवण्यात आली आहे.

सध्या देशातील 8 बँकांनी ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यामध्ये कॅनेरा बँक, एचडीएफसी बँक, इंडियन बँक, कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक यांच्या ग्राहकांना ही सुविधा मिळत आहे.

युपीआय लाईट अॅपमधून पेमेंट करण्यासाठी इंटरनेटची गरज राहणार नाही. मात्र या खात्यात रक्कम जमा करण्यासाठी तुम्हाला इंटरनेटची गरज लागेल. त्याशिवाय रक्कम जमा करता येणार नाही.

'...तर पक्षातून हकालपट्टी', अजितदादांचा आपल्याच नेत्यांना सूचक इशारा
'...तर पक्षातून हकालपट्टी', अजितदादांचा आपल्याच नेत्यांना सूचक इशारा.
बीडचं पालकमंत्री दादांकडे, कोणत्या कारणानं पालकमंत्रीपद हातून निसटलं?
बीडचं पालकमंत्री दादांकडे, कोणत्या कारणानं पालकमंत्रीपद हातून निसटलं?.
'राणेंनी बोलू नये', मराठा आरक्षणावरून नारायण राणे-जरांगेंमध्ये जुंपली
'राणेंनी बोलू नये', मराठा आरक्षणावरून नारायण राणे-जरांगेंमध्ये जुंपली.
धनंजय मुंडे यांचं सुरेश धस अन् मनोज जरांगे पाटलांना खुलं आव्हान
धनंजय मुंडे यांचं सुरेश धस अन् मनोज जरांगे पाटलांना खुलं आव्हान.
पालकमंत्रीपदावरून शिवसेना नाराज? एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावी?
पालकमंत्रीपदावरून शिवसेना नाराज? एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावी?.
G-Pay नं पेमेंट अन् सुगावा, मध्यरात्री सैफच्या आरोपीला ठोकल्या बेड्या
G-Pay नं पेमेंट अन् सुगावा, मध्यरात्री सैफच्या आरोपीला ठोकल्या बेड्या.
पहाटेचा शपथविधी एक षडयंत्र, धनंजय मुंडे यांचा नेमका कोणाकडे इशारा?
पहाटेचा शपथविधी एक षडयंत्र, धनंजय मुंडे यांचा नेमका कोणाकडे इशारा?.
प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव, आगीत 100 हून तंबू जळून खाक
प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव, आगीत 100 हून तंबू जळून खाक.
'मीच दादांना पालकमंत्रीपद घेण्याची विनंती केली, कारण..' - धनंजयय मुंडे
'मीच दादांना पालकमंत्रीपद घेण्याची विनंती केली, कारण..' - धनंजयय मुंडे.
'मी दादांना सांगितलं होतं की..',पहाटेच्या शपथविधीवरून मुंडेंचं वक्तव्य
'मी दादांना सांगितलं होतं की..',पहाटेच्या शपथविधीवरून मुंडेंचं वक्तव्य.