AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UPI Payment : ना QR Code ना पिनची झंझट, नवीन फिचरने होईल पेमेंट झटपट 

UPI Payment : डेबिट-क्रेडिट कार्डचा लवकरच बाजार उठणार आहे. आता कुठे पण तुम्हाला सहज पेमेंट करता येईल. त्यासाठी ना पिनची गरज लागेल ना क्यूआर कोडची आवश्यकता भासेल. युपीआय पेमेंटसाठी आरबीआय आणि NPCI अनेक प्रयोग करत आहेत. त्यातील हे एक क्रांतीकारी पाऊल आहे.

UPI Payment : ना QR Code ना पिनची झंझट, नवीन फिचरने होईल पेमेंट झटपट 
| Updated on: Sep 09, 2023 | 2:47 PM
Share

नवी दिल्ली | 9 सप्टेंबर 2023 : आता तुम्हाला पेमेंट करण्यासाठी क्रेडिट वा डेबिट कार्डची (Debit Credit Card) गरज पडणार नाही. केवळ POS मशीनवर एक टॅप केल्यानंतर सहज पेमेंट होईल. तुमच्या खात्यातून झटपट रक्कम कपात होईल. त्यासाठी क्यूआर कोड स्कॅन (QR Code Scan) करण्याची वा पिन टाकण्याची गरज भासणार नाही. प्लास्टिकच्या क्रेडिट-डेबिट कार्डचा बाजार लवकरच उठणार आहे. डिजिटल पेमेंट मध्ये (Digital Payment) अनेक कल्पक प्रयोग करण्यात येत आहे. पेमेंट सुलभ आणि सुरक्षितरित्या करण्यासाठी संशोधन सुरु आहे. आता नागरिकांना डेबिट, क्रेडिटकार्ड द्वारे ATM मधून पैसे काढण्याची गरज भासणार नाही. तुम्हाला याशिवाय पैसे तर काढता येतीलच पण दुकानावर, मॉलमध्ये सहज आणि सुरक्षितपणे झटपट पेमेंट करता येईल.

असे काढता येतील पैसे

तुम्ही एकदम सहजपणे बोटातील आगठी अथवा एका खास टॅपद्वारे, हातातील स्मार्ट घड्याळाद्वारे पेमेंट करु शकाल. एटीएममधून पण पैसे काढू शकाल. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या इनोव्हेशन युनिट आणि NPCI ने त्यासाठी महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे. असे अनेक हटके प्रयोग सध्या G-20 Summit च्या भारत मंडपममध्ये दिसत आहे. भारताने आताच विना डेबिट कार्ड ऐटीएमची सुरुवात केली आहे. युपीआय कोड स्कॅन करुन आता लवकरच देशभरात एटीएममधून रक्कम काढता येणार आहे. त्यामुळे डेबिट कार्ड हद्दपार होईल. तर युपीआयवर प्री-अप्रुव्हड लोनची सुविधा आल्याने इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची खरेदी करता येणार आहे. त्यानंतर ईएमआय पर्याय आल्यास क्रेडिट कार्डची दुकानदारी पूर्णपणे बंद होईल.

परदेशी पाहुण्यांना दाखवली आरबीआयने जादू

भारत मंडपममध्ये जी-20 संमेलनात इनोव्हेशन हब सेंटरमध्ये डिजिटल पेमेंटचे अनेक पर्याय दाखविण्यात आले. यामध्ये टॅप अँड पे ही सुविधा दाखविण्यात आली. ही सुविधा नेमकीच सुरु झाली आहे. त्यातंर्गत वापरकर्त्याला 500 रुपयांपर्यंत युपीआय पेमेंट एकदम सहज करता येईल. त्यासाठी त्यांना मोबाईलवरुन QR कोड स्कॅन करण्याची गरज नाही. पिन पण टाकण्याची आवश्यकता नाही. फोनला पीओएस मशीनवर टॅप करुन तुम्ही काही मिनिटात 500 रुपयांपर्यंत पेमेंट करु शकता.

लवकरच बोटातील अंगठी येईल उपयोगी

बोटातील अंगठी अथवा मनगटी घड्याळ पेमेंट मोडवर टॅप करुन तुम्हाला झटपट पेमेंट करता येईल. आरबीआयने ही अनोखी योजना आखली आहे. बँका आता ग्राहकांना यासाठी खास किचन, रिंग उपलब्ध करुन देणार आहे. स्मार्टवॉच कंपन्या पण हे तंत्रज्ञान नव्याने बसवून अशा प्रकारची घड्याळं बाजारात आणत आहेत. पण ही सुविधा रुपे कार्डधारकांसाठी आहे.

ठाकरे बंधूंच्या युतीवर संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य, येत्या आठवड्यात..
ठाकरे बंधूंच्या युतीवर संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य, येत्या आठवड्यात...
जे हिंदुत्वाचे नाही झाले ते... ठाकरेंवर निशाणा साधणाऱ्या बॅनरची चर्चा
जे हिंदुत्वाचे नाही झाले ते... ठाकरेंवर निशाणा साधणाऱ्या बॅनरची चर्चा.
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री.
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का.
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?.
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?.
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...