तुम्हालाही घर खरेदी करायचंय? तर आजच निर्णय घ्या; भविष्यात घरे महागणार! 

तुम्हाला जर घर खरेदी करायचे असेल तर आजच निर्णय घ्या, बांधकाम साहित्याचे वाढते दर पहाता येत्या काळात घरांच्या किमती दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे.

तुम्हालाही घर खरेदी करायचंय? तर आजच निर्णय घ्या; भविष्यात घरे महागणार! 
अजय देशपांडे

|

May 04, 2022 | 5:40 AM

मुंबई : स्वत:चं घर (Home) खरेदीचे स्वप्न बघणाऱ्या किंवा विकत घेणाऱ्यांसाठी एक वाईट बातमी आहे. लवकरच स्वस्त होम लोनचा (Home loan) काळ संपणार आहे. त्यातच बिंल्डिंग मटेरियलच्या वाढत्या भावाने आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. 35 वर्षांचा रितेश घर विकत घेण्याचा विचार करतोय. त्याचं बजेच 35 लाख रुपयांचे आहे. त्याने बजेटनुसार (Budget) फ्लॅटही निश्चित केला .बुकिंग अमाऊंट देताना बिल्डरनं भाव वाढवल्याची माहिती दिली. तसेच येत्या काळात आणखी भाव वाढू शकतात अशी भितीही बिल्डर दाखवतोय. आता काय करावं हा त्याला प्रश्न पडलाय. घरांच्या किंमती का वाढत आहेत हे आता आपण पाहूयात. घराच्या किमतीमध्ये तेजी येण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे दिवसेंदिवस वाढत असलेल्या बांधकाम साहित्याचे भाव आणि मजुरीचे दर हे आहे.

घरांच्या भावावाढीची कारणे

नोटाबंदी, जीएसटी, रेरा आणि नंतर कोरोनासारख्या संकटांना तोंड दिल्यानंतर आता रिअल इस्टेट क्षेत्रात तेजी येत आहे, न विकल्या गेलेल्या घरांची संख्या कमी होऊ लागली आहे. अशा परिस्थितीत नवीन घरांचा पुरवठा कमी आणि मागणीत झपाट्याने वाढ झाल्यामुळे किमती वाढणं साहजिकच आहे. त्याचबरोबर सिमेंट, विटा, बार, स्टील या वस्तूंचे भाव गगनाला भिडत आहेत. त्यामुळे लोकांच्या स्वतःच्या घराच्या स्वप्नाला ग्रहण लागलं आहे. बांधकाम साहित्याच्या किमती वाढल्याने घरांच्या किमती वाढल्या आहेत. परवडणाऱ्या घरांच्या किंमतीत सर्वाधिक वाढ होताना दिसून येत आहे. महागाईमुळे बिल्डरांना जुन्या दराने फ्लॅट विकणे अशक्य झाले आहे.

घराच्या किमती 10 ते 15 टक्क्यांनी वाढणार?

घराच्या किमतीत 10 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ शक्य आहे. आगामी काळात घरांच्या किमती 10 ते 15 टक्क्यांनी वाढण्याची भीती रिअल इस्टेट कंपन्यांची संघटना असलेल्या क्रेडाईने व्यक्त केली आहे. खर्च वाढल्याने आतापर्यंत 5 ते 8 टक्के भाव वाढले आहेत. आणखी 5 ते 7 टक्के भाव वाढीची शक्यता आहे. अशा प्रकारे घर 10 ते 15 टक्क्यांनी महाग होऊ शकते. महागाईचा सर्वात मोठा परिणाम परवडणाऱ्या घरांवर होणार आहे. बांधकाम खर्चात 10 ते 15 टक्के वाढ म्हणजे परवडणाऱ्या घरांच्या किमतीत 20 टक्क्यांनी वाढ होय. कंपन्यांनी किंमत वाढवली नाही तर त्यांच्या मार्जिनवर परिणाम होतो, अशी माहिती क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन पटोडिया यांनी दिली आहे, सध्या काही बांधकाम साहित्याच्या किमती 115 टक्क्यांनी वाढल्या आहेत.आतापर्यंत सिमेंटच्या किमती 100 रुपयांनी वाढल्या आहेत, त्याचवेळी, स्टीलची किंमत 39,000 रुपयांवरून 90,000 रुपये प्रति मेट्रिक टन झाली आहे. 65 टक्के विकासकांना मालमत्तेच्या किमतीत 10 टक्क्यांहून अधिक वाढ अपेक्षित आहे. सर्वेक्षणात 1849 विकासकांना स्थान देण्यात आले. त्याचवेळी एप्रिलमध्ये सिमेंट कंपन्यांनी 12 टक्क्यांनी दरवाढ केली आहे, त्यामुळे घराच्या किमती वाढतच आहेत.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें