AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोळ्यातून पाणी, जळजळ, टोचल्यासारखं होतंय? औषधांशिवाय ‘हे’ सोपे उपाय देतील आराम!

डोळ्यातून सारखं पाणी, आग होतेय, टोचल्यासारखं वाटतंय? मग डॉक्टरांच्या महागड्या औषधांआधी, हे साधे घरगुती उपाय नक्की करून बघा!

डोळ्यातून पाणी, जळजळ, टोचल्यासारखं होतंय? औषधांशिवाय 'हे' सोपे उपाय देतील आराम!
eye irritation
| Edited By: | Updated on: Jun 26, 2025 | 11:46 PM
Share

आजकालच्या डिजिटल युगात आपला बहुतेक वेळ लॅपटॉप, कॉम्प्युटर किंवा मोबाईलच्या स्क्रीनसमोर जातो. ऑफिसचं काम असो, अभ्यास असो किंवा मनोरंजन, स्क्रीनशिवाय आपलं पान हलत नाही. पण या स्क्रीनच्या अतिवापरामुळे आपल्या डोळ्यांवर खूप ताण येतो. डोळ्यातून सारखं पाणी येणं, डोळे कोरडे पडल्यासारखे वाटणं, डोळ्यात तीव्र खाज सुटणं, जळजळ होणं किंवा सुई टोचल्यासारखं वाटणं या समस्या आता अनेकांना जाणवत आहेत. या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!

जर तुम्हालाही असा त्रास होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. सुरुवातीला हे त्रास लहान वाटले तरी, पुढे जाऊन ते गंभीर होऊ शकतात. जास्त स्क्रीन टाइम, प्रदूषण, अपुरी झोप किंवा इतर काही कारणांमुळे डोळ्यांच्या या समस्या वाढू शकतात.

डॉक्टरांनी सांगितलेले सोपे उपाय:

अनेकदा या समस्यांवर साधे आणि घरगुती उपाय खूप प्रभावी ठरतात. जास्त स्क्रीन टाइममुळे होणाऱ्या डोळ्यांच्या त्रासावर काही डॉक्टरांनी सुचवलेले सोपे उपाय खालीलप्रमाणे आहेत, जे तुम्हीही वापरून बघू शकता:

1. ’20-20-20′ चा फॉर्म्युला : हा डोळ्यांना आराम देण्यासाठी एक सोपा आणि प्रभावी नियम आहे. स्क्रीनवर काम करताना दर 20 मिनिटांनी, 20 फूट दूर असलेल्या वस्तूकडे 20 सेकंद नजर स्थिर करा आणि त्यासोबतच किमान 20 वेळा पापण्यांची उघडझाप करा, जेणेकरून डोळे कोरडे होणार नाहीत. लक्षात ठेवा, मोठी माणसं एका वेळी 20-30 मिनिटांपेक्षा जास्त आणि लहान मुलं 15-20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ सलग स्क्रीन वापरू नयेत.

2. डोळ्यांसाठी ‘व्हिटॅमिन डी’ : आपल्या शरीराप्रमाणेच डोळ्यांनाही व्हिटॅमिन डी ची गरज असते, जी थंडीच्या दिवसांत किंवा घराबाहेर कमी फिरल्यास अपुरी पडू शकते. यासाठी, सकाळी 9 ते १12 या वेळेत 25-30 मिनिटे कोवळ्या उन्हात बसणे किंवा फिरणे फायदेशीर ठरते, मात्र थेट सूर्यप्रकाश डोळ्यांवर येणार नाही याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

3. स्क्रीनचं योग्य अंतर : स्क्रीनसमोर काम करताना डोळ्यांवर ताण येऊ नये यासाठी योग्य अंतर राखणे महत्त्वाचे आहे. तुमचा लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर स्क्रीन डोळ्यांपासून किमान ‘एक हातभर’ म्हणजे दीड ते दोन फूट दूर असावा आणि स्क्रीन डोळ्यांच्या पातळीपेक्षा थोडी खाली ठेवल्यास डोळ्यांना आराम मिळतो.

4. डोळ्यांचा सोपा व्यायाम : डोळ्यांच्या स्नायूंना निरोगी ठेवून ताण कमी करण्यासाठी काही सोपे व्यायाम नियमितपणे करणे महत्त्वाचे आहे. यासाठी, डोळे 10 वेळा वर-खाली, 10 वेळा डावीकडे-उजवीकडे, आणि नंतर 10 वेळा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने व 10 वेळा उलट दिशेने गोल फिरवा. हा व्यायाम दिवसातून 3 ते 4 वेळा केल्यास डोळ्यांना निश्चितच आराम मिळेल.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.