AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाने लग्नाचा बेत फसला तरी मिळणार पैसे, 7500 रुपयात 10 लाखांचा लग्न  विमा; अनेक कंपन्या इन्शुरन्ससाठी मैदानात  

कोरोनाने सुखी संसार सुरु होण्यापूर्वीच मोडता घातला तरी चिंता करु नका, केलेल्या खर्चाची पै नी पै तुम्हाला वसूल करता येईल.  सात फेरे घेण्यापूर्वीच कोरोनाने लग्न होऊ शकले नाही तर विमा कंपन्या तुमच्या नुकसानीची भरपाई करतील. त्यामुळे भविष्यातील आर्थिक ताण हलका होईल. काय आहे हा विमा जाणून घेऊयात.  

कोरोनाने लग्नाचा बेत फसला तरी मिळणार पैसे, 7500 रुपयात 10 लाखांचा लग्न  विमा; अनेक कंपन्या इन्शुरन्ससाठी मैदानात  
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Dec 30, 2021 | 9:03 AM
Share

मुंबई:  गेल्या दोन वर्षांपासून कोरोना रुपी राक्षस बहुरुपी होऊन संपूर्ण जगाला वेठीस धरु पाहत आहे. त्यामुळे जीवनातील सर्वात आनंदाच्या क्षण, प्रसंगावरही दहशतीची आणि धोक्याची भीती कायम आहे. कोरोनाचा नवीन व्हेरियंट ओमायक्रॉनची रुग्णसंख्या सध्या वाढत आहे. लग्न तिथी कमी असल्या तरी अनेकांनी लग्नासाठी हॉल, कॅटरिंग, बँडबाजा, वरातीची जय्यत तयारी केली आहे. मात्र प्रशासनाकडून दिवसागणिक नव-नवीन नियमांची घोषणा करण्यात येत आहे. त्यामुळे अनेकांचे दाम्पत्य जीवनात  प्रवेशाच्या स्वप्नांना सुरुंग लागण्याची दाट शक्यता आहे.सरकारने निर्बंध वाढविल्यास मंगल कार्यालये, लग्न हॉल्स, फॉर्म हाऊसवरील लग्न सोहळ्याला ब्रेक लागू शकतो. अशावेळी अ‍ॅडव्हान्स बुकींग म्हणून दिलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता नाममात्र राहते. अशावेळी नुकसान टाळण्यासाठी वेडिंग इन्शुरन्स चा आधार मिळू शकतो.

असा आहे प्लॅन

भारतात आयसीआयसीआय लोम्बार्ड, फ्युचर जनराली, एचडीएफसी आर्गो, बजाज एलियांज जनरल इन्शुरन्स या कंपन्यांनी कोरोना काळातील लग्नसमारंभासाठी वेडिंग इन्शुरन्सची सुरक्षा प्रदान केली आहे. तुम्हाला विमा किती लाखांपर्यंत हवा. तुम्हाला किती लाखांचे विम्याचे कवच हवे, यासंबंधीचे निवडीचे स्वातंत्र्य तुम्हाला देण्यात आले आहे. त्याप्रमाणे तुम्हाला विमा हप्ता येईल. त्यासाठी  विमा रक्कमेच्या 0.7 ते 2 टक्क्यांपर्यंत विमा रक्कमेचा हप्ता चुकता करावा लागेल. अर्थात 10 लाखांच्या लग्न विम्यासाठी 7,500 ते 15,000 रुपयांचा हप्ता द्यावा लागेल. विशेष लग्न लांबणीवर पडले तरी तुम्हाला विम्यासाठी दावा दाखल करता येणार आहे.

विम्यात या गोष्टींचा असेल समावेश

केटरिंगसाठी दिलेली आगाऊ रक्कम

विवाहसाठी बुक केलेल्या लग्न हॉल, रिसॉर्ट, फार्म हाऊस यांना दिलेली आगाऊ रक्कम

ट्रॅव्हल एजन्सींना बुकींगसाठी दिलेली अगाऊ रक्कम

नातेवाईकांच्या सोयीसाठी हॉटेल बुकींगसाठी दिलेली टोकन अमाऊंट

लग्न पत्रिका छापण्यासाठी दिलेला खर्च

लग्न सोहळा दिमाखदार होण्यासाठी केलेला खर्च

बँडबाजासाठीचा खर्च

तसेच सजावट आणि इतर अनुषंगिक खर्च

विम्यासाठी या गोष्टी महत्वाच्या

लग्नासाठीच्या खर्चाचा आरखडा विमा कंपनीला द्यावा लागेल

लग्नस्थळाची माहिती, बुकिंग पावत्या विमा प्रतिनिधीला द्यावा लागतील

क्लेमसाठी अगोदरच सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन अर्ज भरुन द्यावा

विवाह सोहळ्यात चोरीची घटना घडल्यास पोलिसांकडे रीतसर तक्रार नोंदवा

एफआयआरची प्रत  विमा कंपनीला सादर करा

लग्नाचा बेत रद्द झाल्यास विमा प्रतिनिधी भेट देऊन यासंबंधीचा पडताळा करेल

त्यानंतर विमा दावा मंजूर, नामंजूर करेल.

विमा दावा नामंजूर केल्यास तुम्हाला संबंधित न्यायालयात दाद मागता येईल.

अशा परिस्थितीत नाही मिळणार विमा

दहशतवादी हल्ला झाल्यास

अचानक संप पुकारल्यास

नवरा अथवा नवरीचे अपहरण

लग्नप्रसंगी दोन्ही पक्षांपैकी एखादा हजर न राहिल्यास

लग्नाचे कपडे अथवा खासगी वस्तुंचे नुकसान

इलेक्ट्रिकल अथवा मॅकनिकल नादुरुस्ती

लग्नप्रसंगी दोन्ही पक्षांपैकी एखाद्याने आत्महत्या केल्यास

या गोष्टी ठेवा लक्षात

विम्यासंबंधीच्या अटी व शर्ती काटेकोरपणे वाचा

विम्याची संपूर्ण माहिती घ्या

विमा कोणत्या वस्तूंवर आणि सेवांसाठी देण्यात येणार त्याची बारकाईने तपासणी करा

त्यासाठीच्या अटी व शर्ती काय याची माहिती घ्या

विवाह सोहळा रद्द करावा लागला तर त्यावर विमा संरक्षण मिळण्याला प्राथमिकता द्या

दुर्घटना, चोरी, आग लागणे यासाठी तुम्ही स्वतंत्र विमा खरेदी करु शकता

संबंधित बातम्या

नव्या वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांना गिफ्ट: थकित रक्कम लवकरच वर्ग, महागाई भत्त्यांत वाढ!

शेअर्सप्रमाणे सोन्याचं ट्रेडिंग : EGR ‘सिक्युरिटीज’च्या कक्षेत, अर्थ मंत्रालयाचा निर्णय

रिलायन्समध्ये होणार नेतृत्वबदल; मुकेश अंबानींनी दिले निवृत्तीचे संकेत, कोण होणार उत्तराधिकारी?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.