नव्या वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांना गिफ्ट: थकित रक्कम लवकरच वर्ग, महागाई भत्त्यांत वाढ!

नव्या वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांना गिफ्ट: थकित रक्कम लवकरच वर्ग, महागाई भत्त्यांत वाढ!
debt relief Don't lend today by mistake or you will suffer bad consequences

थकित महागाई भत्त्यासोबत नव्या वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांना नववर्षाची भेट मिळण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना 18 महिन्यांचा महागाई भत्त्यातील फरक मिळाल्यास मोठा आर्थिक लाभ ठरणार आहे. कर्मचारी गटाने सातव्या वेतन आयोगाप्रमाणे 18 महिन्यांच्या महागाई भत्त्याची रक्कम एक वेळेस अदा करण्याची मागणी केली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सिद्धेश सावंत

Dec 29, 2021 | 11:33 PM

नवी दिल्ली : नववर्ष उजाडण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. नव्या आशा अपेक्षांसह नव्या वर्षाच्या स्वागतासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. केंद्रीय कर्मचारी मराठी देखील अपवाद ठरत नाही. एका अहवालानुसार, कर्मचाऱ्यांच्या 18 महिन्यांच्या थकित महागाई भत्त्यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. केंद्रीय कॕबिनेटच्या होणाऱ्या आगामी बैठकीत थकित महागाई भत्त्याच्या प्रलंबित मुद्द्याचा निपटारा होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

‘या’ मुद्द्यांवर यापूर्वीच निर्णय:

थकित महागाई भत्त्यासोबत नव्या वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांना नववर्षाची भेट मिळण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना 18 महिन्यांचा महागाई भत्त्यातील फरक मिळाल्यास मोठा आर्थिक लाभ ठरणार आहे. कर्मचारी गटाने सातव्या वेतन आयोगाप्रमाणे 18 महिन्यांच्या महागाई भत्त्याची रक्कम एक वेळेस अदा करण्याची मागणी केली आहे. अर्थ मंत्रालयासोबत सध्या चर्चा सुरु आहेत.

महागाई भत्ता 34%

केंद्र सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. संभाव्य वाढ आणि निर्णय अंमलबजावणी याविषयी अधिकृतपणे कोणतीही माहिती समोर आलेली नाही. महागाई भत्ता 31 टक्क्यांवरुन 34 केला जाण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पावर भार पडण्याची शक्यता विचारात घेऊन अतिरिक्त रकमेची तरतूद करण्याचे निर्देश मंत्रिमंडळ बैठकीत दिले जाण्याची शक्यता आहे.

किमान मूळ वेतनात वाढ

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ वेतनात वाढ अपेक्षित आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन 18,000 रुपये आहे. आतापर्यंत 31 टक्के महागाई भत्त्यानुसार 5580 रुपये वेतनात जमा होत होते. डीए रकमेत 34 टक्के वाढीमुळे मूळ वेतनात 6120 रुपयांची प्रति महिना वाढ होईल. प्रति महिना 540 रुपयांची वाढ होईल. वार्षिक आधारावर विचार करता 6480 रुपयांची वाढ अपेक्षित असेल.

कमाल मूळ वेतनात वाढ

केंद्रीय कर्मचाऱ्यांचे कमाल मूळ वेतन 56,900 रुपये आहे. 31 टक्के महागाई भत्त्यानुसार 17,639 रुपयांचा डीए प्रति महिना प्राप्त होईल. जर 34 टक्क्यांनुसार विचार केल्यास प्रतिमाह 19346 रुपये वाढ दिसून येईल. वार्षिक आधारावर कर्मचाऱ्यांच्या वेतनात 20,484 रुपयांची वाढ अपेक्षित असेल.

इतर बातम्या –

Mutual Fund | म्युच्युअल फंड: महिन्याला हजार गुंतवा, 20 वर्षांत लखपती व्हा!

शेअर्सप्रमाणे सोन्याचं ट्रेडिंग : EGR ‘सिक्युरिटीज’च्या कक्षेत, अर्थ मंत्रालयाचा निर्णय

कॅशलेस नाही तर कॅश कॅश चा नारा, नव्या नियमांचा डिजिटल व्यवहारांना फटका 


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें