एटीएम कार्ड हरवलंय? त्वरित करा ‘हे’ काम, अन्यथा होईल लाखोंचे नुकसान

त्यामुळे जर तुमचेही एटीएम कार्ड हरवले असेल आणि त्याचा गैरवापर टाळायचा असेल तर त्यासाठी आपल्याला त्वरित पावलं उचलणं गरजेचे आहे. (What to do if you lose your debit card know the full process)

एटीएम कार्ड हरवलंय? त्वरित करा 'हे' काम, अन्यथा होईल लाखोंचे नुकसान
debit-card

मुंबई : आपल्या दैनंदिन आयुष्यात एटीएम कार्ड हे फार महत्त्वाचे असते. यामुळे एका क्लिकवर पैसे काढणे सोपे झाले आहे. त्यामुळेच ते सांभाळून ठेवणे गरजेचे असते. मात्र अनेकदा घाईघाईत डाव्या-उजव्या हाताने एटीएम कार्ड कुठे तरी ठेवतो आणि ते विसरुन जातो. त्यामुळे जर तुमचेही एटीएम कार्ड हरवले असेल आणि त्याचा गैरवापर टाळायचा असेल तर त्यासाठी आपल्याला त्वरित पावलं उचलणं गरजेचे आहे. ज्यामुळे तुमच्या डेबिट किंवा क्रेडीट कार्डाचा गैरवापर रोखता येईल. (What to do if you lose your debit card know the full process)

जर तुमचे एटीएम कार्ड हरवले, तर सर्वप्रथम बँकेत संपर्क साधणे गरजेचे आहे. तसेच तुमच्या जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये कार्ड गमावल्याबद्दल एफआयआर नोंदवण्याचा सल्लाही दिला जातो. या एफआयआरची प्रत बँकेला देऊन तुम्ही अशाप्रकारे एखादी घटना घडली आहे, याची माहिती देऊ शकता.

Internet Banking ची मदत घ्या

जर तुमचे एटीएम कार्ड हरवले तर ते हरवल्याची नोंद करण्याचे अनेक मार्ग आहेत. यासाठी आपण फोन बँकिंग अधिकाऱ्याला याबद्दलची माहिती द्या. जर आपण इंटरनेट बँकिंग(Internet Banking)ची वापरत असाल, तर त्या मदतीने तुम्हाला त्वरित कार्ड ब्लॉक करता येते.

यासाठी प्रथम आपण इंटरनेट बँकिंग वर जा आणि लॉगिन करा. यानंतर, डेबिट कार्ड पर्यायावर जा. येथे आपण आपला डेबिट कार्ड नंबर निवडा जो हरवला किंवा गमावला आहे. त्यानंतर, आपले डेबिट कार्ड ब्लॉक करा(Block your Debit Card) या पर्यायावर क्लिक करून आपले कार्ड ब्लॉक करा. आता आपल्या कार्डमधून कोणीही पैसे काढू शकणार नाही.

मोबाईल बँकिंग अ‍ॅपने बंद करा एटीएम

मोबाईल बँकिंग अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही तुमचे कार्ड ब्लॉक देखील करू शकता. यासाठी तुम्हाला संबंधित मोबाईलमध्ये संबंधित बँकेचे अ‍ॅप सुरु करावे. त्यात तुम्हाला कार्ड ऑप्शन दिसेल. त्यावर जा आणि तुमचे डेबिट कार्ड ब्लॉक करण्याच्या पर्याय निवडा. त्यावर क्लिक केल्यावर हे कार्ड ब्लॉक होईल.

हेल्पलाईन नंबरवर कॉल करा

आपण बँकेच्या हेल्पलाईन नंबरवर कॉल करून आपले एटीएम कार्ड देखील ब्लॉक करू शकता. यासाठी तुम्हाला तुमचा एटीएम आणि बँक खाते क्रमांक सांगावा लागेल. तसेच तुम्ही शेवटचा व्यवहार कधी केला, आपण किती रुपयांचा व्यवहार केला याचीही माहिती शेअर करावी लागेल. या सर्व गोष्टींची पडताळणी झाल्यानंतर तुमचे कार्ड ब्लॉक केले जाईल.

एफआयआर करायला विसरु नका

जर तुमचे एटीएम कार्ड चोरीला गेले असेल, तर याबाबत त्वरीत एफआयआर(FIR) नोंदवा. यासाठी तुम्हाला जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये कार्ड चोरीचा अहवाल द्यावा लागेल. एफआयआर नोंदविल्यानंतर त्याची एक प्रत तुम्हाला दिली जाईल. ही प्रत भविष्यात वापरासाठी जपून ठेवावी.

नवीन कार्डासाठी अर्ज कसा कराल?

एटीएम कार्ड ही महत्त्वाची आणि दैनंदिन गरजेची वस्तू असल्याने त्याची काळजी घेणं फार गरजेचं आहे. यामुळे जर तुमचे कार्ड हरवले तर तुम्ही त्वरित नवीन कार्डसाठी अर्ज करु शकता. अवघ्या दोन-तीन दिवसात तुम्हाला नवीन कार्ड उपलब्ध होते. काही बँका नवीन कार्डसाठी शुल्क आकारतात. तर एखाद्या विशिष्ट कालावधीत तुम्ही कार्ड हरवल्याचे माहिती बँकेला दिल्या, तुम्हाला नवीन कार्डसाठी कोणतेही वेगळे शुल्क द्यावे लागत नाही.

बँकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जर तुम्ही कार्ड चोरीला किंवा हरवल्याची माहिती त्वरित बँकेला कळवली तर त्याचे असंख्य फायदे तुम्हाला मिळतात. यानंतर बँक कायदेशीरपणे ग्राहकांच्या हिताची काळजी घेते. ते कार्ड ब्लॉक करणे किंवा फ्रीज करणे यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी बँकेतर्फे तातडीने केल्या जातात. मात्र जर तुम्ही वेळेत कार्ड चोरीला गेल्याची किंवा हरवल्याची माहिती दिली नाही तर त्यानंतर कार्डद्वारे कोणतेही फसवणूक झाली तर बँक त्याची जबाबदारी घेत नाही.  (What to do if you lose your debit card know the full process)

संबंधित बातम्या: 

Salary Overdraft: गरज पडल्यास काही मिनिटात पैसे मिळणार, या उपयोगी सुविधेचे नियम आणि अटी काय?

3 वर्षात तब्बल 9600 टक्क्यांचा बंपर फायदा देणारी रामदेव बाबांची कंपनी, पुन्हा एकदा गुंतवणुकीची संधी

तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा आहेत? या नंबरवर मेसेज करुन एका मिनिटात माहिती मिळवा

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI