मुंबईः निवृत्ती वेतन धारकांच्या सुविधा कडे लक्ष देत सरकारने सर्व निवृत्ती वेतन धारकांना लाइफ डिजिटल सर्टिफिकेट (Digital life certificate) दिले आहे. हे सर्टिफिकेट ऑनलाईन पद्धतीने बनवले जाते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्टिफिकेट ला तुम्हाला कोणत्याही एजन्सीमध्ये किंवा बँकेमध्ये जमा करण्याची गरज भासत नाही. कोरोना महामारी च्या काळा दरम्यान अनेक नवीन योजना सुरुवात करण्यात आलेल्या आहे जेणेकरून वयोवृद्ध व जे शरीराने थकलेले नागरिक आहेत. जे घरी बसून आपल्या जीवन प्रमाणपत्राच्या (Jeevan Praman Patra) आधारे पेन्शन मिळू शकतील. डिजिटल लाइफ सर्टिफिकेट संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने बनवले जाते त्याच बरोबर यासाठी ची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने (Jeevan Praman Patra Online Apply) पार पाडली जाते म्हणूनच हे सर्टिफिकेट बनवताना अनेकदा काही गडबड होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. अनेकदा चुकीची माहिती भरल्यामुळे तुमचे सर्टिफिकेट रिजेक्ट होऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये तुमची पेंशन थांबून जाईल. आपल्यापैकी अनेकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की डिजिटल लाइफ सर्टिफिकेट रद्द का होते? रेजेक्ट होण्यामागे नेमकी कारणे कोणकोणते असतात. जर कोणत्याही कारणामुळे तुमचे सर्टिफिकेट बाद किंवा रद्द झाल्यास अशा वेळी त्वरित एजन्सीला किंवा बँकेला संपर्क साधायला हवा.