AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टाईट सिक्योरिटीनंतर कसे होते व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट हॅक, या तीन चुका ठरतात महाग

whatsapp hacking: व्हॉट्सअ‍ॅप सुरक्षित अ‍ॅप आहे तर हॅक कसे होते? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. परंतु आपल्या काही चुकांमुळे सायबर गुन्हेगारांना व्हॉट्सअ‍ॅप हॅक करण्याची संधी मिळते. यामुळे व्हॉट्सअ‍ॅप वापरताना या चुका कधीही करु नये. या चुकांमुळेच तुमचा फोन हॅक होतो. 

टाईट सिक्योरिटीनंतर कसे होते व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट हॅक, या तीन चुका ठरतात महाग
whatsapp hacking
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Aug 17, 2024 | 11:00 AM
Share

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांचे व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट हॅक झाल्याचा दावा केला होता. हॅकरने त्यांच्याकडून 400 डॉलरची मागणी केली होती. तसेच सतत त्याच्याकडून ब्लॅकमेल केले जात असल्याची तक्रार सुप्रिया सुळे यांनी केली होती. व्हॉट्सअ‍ॅप आपल्या जीवनाचे आवश्यक भागच बनला आहे. युवकांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाकडे हे अ‍ॅप आहे. आता अनेक जण व्हॉट्सअ‍ॅप खाते हॅक झाल्याची तक्रारी करु लागले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप सुरक्षित अ‍ॅप आहे तर हॅक कसे होते? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. परंतु आपल्या काही चुकांमुळे सायबर गुन्हेगारांना व्हॉट्सअ‍ॅप हॅक करण्याची संधी मिळते. यामुळे व्हॉट्सअ‍ॅप वापरताना या चुका कधीही करु नये. या चुकांमुळेच तुमचा फोन हॅक होतो.

  • टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन

आपल्या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये नेहमी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरु ठेवा. त्यामुळे सिक्योरिटी वाढते. त्यासाठी तुम्हाला एक पिन सेट करावी लागते. टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरु राहिल्यानंतर कधीकधी व्हॉट्सअ‍ॅपकडून ही पिन टाकण्याचा संदेश येतो. तुम्ही पिन कोणासोबत शेअर करु नका. नाहीतर व्हॉट्सअ‍ॅप हॅक होण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो.

  • रजिस्ट्रेशन कोड शेअर करु नका

व्हॉट्सअ‍ॅप जेव्हा सुरु असते तेव्हा लिंक्ड डिव्हाईससाठी रजिस्ट्रेशन कोड येतो. तुमच्याकडून कोणी हा रजिस्ट्रेशन कोड मिळवला तर तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपच्या संपूर्ण अॅक्सेस त्याला मिळेल. हा रजिस्ट्रेशन कोड वापरुन तो कोणालाही मेसेज पाठवू शकतो. त्यामुळे हा रजिस्ट्रेशन कोडही कधी शेअर करु नका.

  • अनोळखी लिंकवर क्लिक करु नका

व्हॉट्सअ‍ॅप हॅक होण्याचे आणखी एक मोठे कारण आहे. तुम्हाला जर मेसेज किंवा ईमेलच्या माध्यमातून लिंक मिळाली, तुम्ही चुकीने त्या लिंकला क्लिक केले तर तुमचा फोन हॅक होऊ शकतो. कोणाकडे तुमच्या फोनचा अ‍ॅक्सेस गेल्यावर व्हॉट्सअ‍ॅप सहज हॅक होऊ शकतो.

Follow Us
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का! 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता...
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता सलाईन आणि पाणीही...
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
Manoj Jarange Patil | गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?