आता पळवाट नाही, तुमची गुपीतं उघड करणाऱ्यांचा होणार भांडाफोड; चॅटिंगचे स्क्रीनशॉट घेतल्यास व्हॉट्सअ‌ॅपवर नोटिफिकेशनचा अलर्ट

तुमचं खासगी आयुष्य आणखी सिक्युअर(Secure) करण्यासाठी व्हॉट्सअ‌ॅप एक नवीन फिचर्स दाखल करु पाहत आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत चॅटिंग करताना त्याने त्या चॅटिंगचा स्क्रीनशॉट काढला तर तात्काळ त्यासंबंधीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार आहे.

आता पळवाट नाही, तुमची गुपीतं उघड करणाऱ्यांचा होणार भांडाफोड; चॅटिंगचे स्क्रीनशॉट घेतल्यास व्हॉट्सअ‌ॅपवर नोटिफिकेशनचा अलर्ट
Follow us
| Updated on: Dec 13, 2021 | 11:39 AM

नवी दिल्ली:  मोबाईलच्या युगात प्रायव्हसी हाय पृथ्वी मोलाची, तू कर बिनधास्त चॅटिंग गड्या तुले भीती कशाची नी परवा भी कुणाची? आता तुम्ही म्हणाल भावड्या असा झोकात  कायले अशी गाणी बडबडून -हायला. तर मित्रांनो सांगतो, व्हाट्सअपने एक झकास फिचर्सची तयारी केली आहे. म्हणजे येत्या काही दिवसांत ते फिचर्स तुमच्या मोबाईलवर येऊन धडकेलच. तर हे नवं आयुध आहे तुमचा खासगीपणा जपण्यासाठी. डिजिटल युगात तुमचा खासगीपणा  अरे हो बाबा, तुमची  ‘Privacy’ जपणं अधिक गरजेचे झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून युझर्सचा डाटा चोरून त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केल्याचे  अनेक प्रकार उघड झाले आहेत. या तक्रारींचा सूर ओळखून व्हाट्सअप नवनवीन फिचर्सच्या माध्यमातून युजर्सची प्रायव्हसी जपते. आता युजर्सच्या सुरक्षेसाठी पुन्हा नवीन फिचर्स येऊ घातलं आहे. दोन व्यक्ती लिखीत स्वरुपात  संवाद साधत असताना समोरील व्यक्तीने स्क्रीन शॉट काढला तर व्हाट्सअप तुम्हाला त्याची त्वरीत माहिती देईल. त्यासंबंधीचे नोटीफिकेशन त्वरीत तुम्हाला मिळेल. हे फिचर्स उपलब्ध झाल्यास जगातील कोट्यवधी युजर्सला त्याचा फायदा होणार आहे.

मीडिया रिपोर्ट

मीडिया रिपोर्टसनुसार, व्हाट्सअपने या फिचर्सवर अनेक दिवसांपूर्वीच काम सुरु केले आहे. या फिचर्सचा उद्देश युजर्सची प्राईव्हसी जपणे हा आहे. जेव्हा एखादा व्यक्ती स्क्रीनशॉट काढतो. त्याचवेळी व्हाट्सअप त्याला नोटिफिकेशनद्वारे याची माहिती देईल.

तीन ब्लू टीक

व्हाट्सअपवर जेव्हा दुसरा व्यक्ती मॅसेज वाचतो. त्यावेळी व्हाट्सअपवर मॅसेज रीड झाल्याच्या दोन ब्लू खूण निर्देशीत करते की, त्याने मॅसेज वाचला आहे. तसेच ज्यावेळी या मॅसेजचा तो स्क्रीन शॉट घेईल त्याचवेळी या नवीन फिचर्समुळे तीन ब्लू टीक होतील.

अधिकृत घोषणा नाही

अजून हे फिचर्स बाल्यावस्थेत आहे.ते अजुनही रिलीज करण्यात आलेले नाही. यावर काम सुरु आहे. रिपोर्टसनुसार, लवकरच नव्या फिचर्सवर चाचणी सुरु होणार आहे. चाचणी यशस्वी होताच हे फिचर रिलीज करण्यात येईल. अद्यापही कंपनीने अधिकृतरित्या या फिचर्सची पुष्टी केलेली नाही. पण रिपोर्ट आधारे, लवकरच हे फिचर्स युजर्ससाठी उपलब्ध होण्याची शक्यता दाट आहे.

संबंधित बातम्या 

व्हॉट्सअ‌ॅप स्कॅम अलर्ट! ‘या’ फीचरचा जपून वापर करा अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते!

Samsung Galaxy S21 सिरीजवर 10 हजार पर्यंतचा कॅशबॅक उपलब्ध, वाचा महत्वाची माहीती!

तुमचं WhatsApp नव्या वर्षात किती बदलणार? 4 नवे फिचर्स कोणकोणते येणार? गुड मॉर्निंग मेसेज 90 दिवस रहाणार?

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.