AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फाटलेल्या नोटांची चिंता सोडा, RBI हे नियम वाचा, आणि बँकेत जाऊन नोटा बदलून घ्या!

फाटलेल्या वा टेपने चिटकवलेल्या नोटांबाबत भारतीय रिझर्व बँकेंचा काय नियम आहे? बँकेच्या नियमात राहून या नोटांचं काय करायला हवं? आणि ही नोट चलनात कशी आणावी?

फाटलेल्या नोटांची चिंता सोडा, RBI हे नियम वाचा, आणि बँकेत जाऊन नोटा बदलून घ्या!
| Edited By: | Updated on: Sep 22, 2021 | 4:01 PM
Share

असं बऱ्याचदा होतं की, तुम्हाला फाटलेली नोट कुठूनतरी मिळते, फाटलेल्या नोट मिळाल्याचं तुमच्या खूप नंतर लक्षात येतं, आणि मग ती नोट पुन्हा चलनात आणणं अवघड होऊन जातं. तुम्ही ऐनकेन प्रकारे ती नोट चालवण्याचा प्रयत्न करता, पण बऱ्याचदा नोट इतकी फाटलेली असते की, ती कुणीही स्वीकारत नाही. म्हणूनच प्रश्न पडतो, की फाटलेल्या वा टेपने चिटकवलेल्या नोटांबाबत भारतीय रिझर्व बँकेंचा काय नियम आहे? बँकेच्या नियमात राहून या नोटांचं काय करायला हवं? आणि ही नोट चलनात कशी आणावी? याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला आज देणार आहोत. (Where to exchange torn notes? What are the rules of Reserve Bank of India? Which torn note can be replaced?)

फाटक्या नोटांबाबत आरबीआयने काही नियम बनवले आहेत आणि तुम्ही बँकेत जाऊन अशा नोटा बदलू शकता. तुम्ही बँकेत जुन्या आणि फाटलेल्या नोटा बदलू शकता. अगदी अनेक तुकडे झालेल्या नोटाही बदलल्या जाऊ शकतात आणि ज्या नोटा पूर्ण नाहीत, त्या नोटांच्या बदल्यात बँक त्यांच्या हिशोबाने पैसे देते. मात्र, नोटा बदलताना तुम्हाला बँकांचे नियम माहित असणं गरजेचं आहे.

बँकेचे नियम काय आहेत?

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) 2017 च्या एक्सचेंज करन्सी नोट नियमांनुसार, जर तुम्हाला एटीएममधून फाटक्या नोटा मिळाल्या तर तुम्ही त्या सहज बदलू शकता. नियमावलीनुसार, कोणतीही सरकारी बँक (PSB) नोटा बदलण्यास नकार देऊ शकत नाही. बँकांना अशा नोटा स्वीकाराव्याच लागतात.

कुठल्या प्रकारच्य नोटा बदलून मिळतात.

अगदी जरी एका नोटचे अनेक तुकडे झाले, तरी ते बँकेत बदलून मिळू शकतात. फाटलेल्या नोटेचा कोणताही भाग गहाळ झाला तरी बँक ती नोट बदलून देऊ शकते. मात्र जर नोटा पूर्णपणे फाटलेल्या आहेत, पूर्णपणे कापल्या किंवा जळालेल्या आहेत तर, त्या फक्त RBI च्या इश्यू ऑफिसमध्ये बदलता येऊ शकतात. थोड्याफार फाटलेल्या नोटा तर कुठल्याही सरकारी बँकेतून बदलून मिळू शकतात. नोटा बदलण्यासाठी तुम्हाला आरबीआयने जारी केलेला फॉर्म भरावा लागतो, जो सरकारी बँकेत सहज मिळतो.

तुम्हाला पूर्ण पैसे परत मिळतात का?

बऱ्याचदा असं होतं की, खूप साऱ्या फाटलेल्या नोटा तुमच्याकडे असतात. किंवा काही अपघातामुळे रोख रकमेची नासधूस होते, आग लागणे, उंदराने लॉकरमधील नोटा कुरतडणे अशी कारणं यामागे असू शकतात. त्यावेळी प्रश्न तयार होतो, की तुम्हाला नोटची संपूर्ण रक्कम मिळते का? तर हे पूर्णपणे नोटची स्थिती आणि नोटांच्या मूल्यावर अवलंबून आहे. सामान्य फाटलेल्या नोटच्या बाबतीत, तुम्हाला पूर्ण पैसे मिळतात, पण, जर नोटा अधिक फाटलेल्या असतील तर तुम्हाला काही टक्के रक्कम परत मिळते. हे गणित थोडं क्लिष्ट आहे ते सोपं करुन पाहू.

नोटा बदलण्याचं क्लिष्ट गणित सोप्या भाषेत!

जर 50 रुपयांपेक्षा कमी मूल्याच्या नोटेचा सर्वात मोठा तुकडा, हा नोटच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर या नोटच्या बदल्यात त्याचे पूर्ण मूल्य बँक देते. जर 50 रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या नोटचा सर्वात मोठा तुकडा, त्या नोटपेक्षा 80 टक्के किंवा जास्त असेल, तर तुम्हाला या नोटच्या बदल्यात संपूर्ण रक्कम दिली जाते. म्हणजे त्या नोटेचा 80 टक्के भाग तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जर 50 रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या नोटचा सर्वात मोठा तुकडा, हा नोटच्या 40 ते 80 टक्के दरम्यान असेल, तर तुम्हाला त्या नोटचे अर्धच मूल्य मिळतं.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.