Gold Making Charges : दागिने घडविताना का द्यावे लागतात मेकिंग चार्जेस, का बसतो याचा भूर्दंड

Gold Making Charges : सोने खरेदी करताना घासघीस करुन जी किंमत ठरते, त्यात मेकिंग चार्ज समाविष्ट असतो. तर घडवणीचे शुल्क का आकारले जाते, त्याचा भूर्दंड का सहन करावा लागतो.

Gold Making Charges : दागिने घडविताना का द्यावे लागतात मेकिंग चार्जेस, का बसतो याचा भूर्दंड
Follow us
| Updated on: Apr 25, 2023 | 11:00 AM

नवी दिल्ली : सोन्याच्या दागिन्यांचे (Gold Jewellery) वेड कोणाला नाही. सोन्याचे आभुषण सर्वच स्त्रीयांना आवडतात. प्रत्येक जण त्याच्या गरजेनुसार, आवडीनुसार, दागिन्यांची खरेदी करतो. प्रत्येकाला आपल्याकडे अधिकाधिक सोने असावे, असे वाटते. जेव्हा पण तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करता, त्यावेळी सोन्याच्या किंमतीत दागिने घडवणीचे शुल्क, मेकिंग चार्जेस समाविष्ट असते. ग्राहकांना ही रक्कम द्यावी लागते. एवढेच नाही तर ग्राहकांना बिल तयार होताना त्यात जीएसटी ही द्यावा लागतो. मेकिंक चार्ज कसा तयार करण्यात येतो? ज्वेलरीच्या एकूण किंमतीत किती मेकिंग चार्ज (Making Charges) आकारण्यात येतो, याची प्रत्येकाला उत्सुकता असतेच.

मेकिंग चार्ज कसा निश्चित होतो ज्वेलरी डिझाईन तायर करण्यासाठी जितका वेळ लागतो, त्या हिशोबाने मेकिंग चार्ज लागतो. सोने किलोच्या मात्रेने बाहेर येते. त्यानंतर दुकानदार, कारागिर, या सोन्यापासून विविध दागिन्यांच्या डिझाईन तयार करतात. ज्यामध्ये 10 ते 30 टक्क्यांपर्यंत मेकिंग चार्ज, घडवणीचे शुल्क आकारण्यात येते. दागिने तयार करताना त्यावर किती सुबकपणे डिझाईन तयार करण्यात आली आहे. किती खुबीने दागिने तयार करण्यात आले आहे. त्यावर हे शुल्क आाकारण्यात येते. जितके आकर्षक, चित्तवेधक आणि बाराकाईने डिझाईन तयार करण्यात येते. तेवढाच त्यावरील मेकिंग चार्ज जास्त असतो. साधारण डिझाईन असेल तर कमी शुल्क आकारण्यात येते.

मेकिंग चार्ज कसा ठरवितात आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मेकिंग चार्ज ठरवितात तरी कसा? समजून घ्या तुम्ही एखादी सोन्याची अंगठी खरेदी केली. त्यामध्ये 40 हजार रुपयांचे सोने असेल. मेकिंग चार्ज 10 टक्के आहे. तर त्याचा अर्थ तुम्हाला या दागिन्यावर 4 हजार रुपयांहून अधिक मेकिंग चार्ज द्यावा लागेल. म्हणजे जीएसटी वगळता ही आंगठी तुम्हाला 44 हजार रुपयांपेक्षा अधिक किंमतीला पडेल. ज्वेलरीच्या शेवटच्या किंमतीत मेकिंग चार्ज लावलेले असतात.

हे सुद्धा वाचा

मेकिंग चार्ज कसा वाचवाल जर तुम्हाला मेकिंग चार्जवर अधिक रक्कम घालवायची नसेल. तर कमी कलाकुसर असलेल्या दागिन्यांची पसंती करा. अधिक बारकाईने आणि आकर्षक ज्वेलरीच्या नादात, आपले बजेट एकदम वाढून जाते. जेवढी अधिक बारकाई, कलाकूसर तेवढे बजेट अधिक, एवढा सोपा फॉर्म्युला आहे. तुम्ही चांगल्या पण अधिक बारकाई नसलेल्या डिझाईन खरेदी कराल तर त्यामुळे तुमचे पैसे वाचतील.

BIS Care APP सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.