AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Interest Rate Cut : काय म्हणता, कर्ज खरंच होणार स्वस्त, महागड्या ईएमआयची संपणार झंझट

Interest Rate Cut : कर्जदारांना आणि कर्ज घेणाऱ्यांना एकाच वेळी मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. महागड्या ईएमआयचा ताप कमी होण्याची शक्यता आहे. पण यामागच्या चर्चा तरी काय आहे.

Interest Rate Cut : काय म्हणता, कर्ज खरंच होणार स्वस्त, महागड्या ईएमआयची संपणार झंझट
| Updated on: May 17, 2023 | 5:47 PM
Share

नवी दिल्ली : कर्जदारांना आणि कर्ज घेणाऱ्यांना एकाच वेळी मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. महागड्या ईएमआयचा (EMI) ताप कमी होण्याची शक्यतेने जोर धरला आहे. अर्थात याविषयीची अधिकृत घोषणा केंद्रीय रिझर्व्ह बँकेने (RBI) केलेली नाही. गेल्या वर्षभरापासून कर्जदारांवर वाढत्या ईएमआयचा सातत्याने मारा सुरु होता. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात रेपो दर (Repo Rate) 4 टक्के होता. सध्या रेपो दर 6.50 टक्क्यांवर पोहचला आहे. अर्थात आरबीआयच्या या धोरणांचा सामान्य ग्राहकांना आणि कर्जदारांना मोठा फटका बसला आहे. मग आताच ईएमआय कमी होण्याच्या चर्चांना फोडणी का देण्यात येत आहे.

काय आहे कारण गेल्या चार दिवसांपासून किरकोळ आणि घाऊक महागाईच्या आकड्यांनी दिलासा दिला आहे. किरकोळ महागाई दर 18 महिन्यांच्या निच्चांकी स्तरावर 4.70 टक्क्यांवर पोहचला. तर एक वर्षांपूर्वी हा दर 7.79 टक्के होता. तर घाऊक महागाई दर गेल्या 3 वर्षांत उणे झाला आहे. हा दर सर्वात निच्चांकीस्तरावर -0.92 टक्के इथपर्यंत घसरला.

इतका वाढला कर्जाचा बोजा समजा एखाद्याने 8.75 टक्के व्याजदराने 25 लाख रुपयांचे 15 वर्षांसाठी गृहकर्ज घेतले आहे. ग्राहकाला दरमहा 24,986 रुपये ईएमआय जमा करावा लागेल. 19,97,518 इतके व्याज चुकते करावे लागेल. पण जर ग्राहकाने 25 वर्षांसाठी कर्ज घेतले तर मासिक हप्ता 20,554 रुपये होईल. पण त्यावर 36,66,076 रुपयांचे व्याज मोजावे लागेल

आता ईएमआय होईल कमी महागाई दरात घसरणीचा फायदा कर्जदारांना होईल. त्यांना गेल्या वर्षभरापासून वाढत्या ईएमआयचे चटके सहन करावे लागले होते. त्यांना एका वर्षांत वारंवार वाढीव ईएमआयचा ताप सहन करावा लागला. पण आता महागाई दर घसरल्याने व्याजदरात कपतीची चर्चा रंगली आहे.

पतधोरण समितीची बैठक भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक 6 ते 8 जून 2023 रोजी दरम्यान होण्याची शक्यता आहे. 8 जून रोजी समितीच्या निर्णयाची घोषणा आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास करतील. गेल्यावेळी रेपो दरात कुठलाही बदल करण्यात आलेला नव्हता. पतधोरण समितीतील काही सदस्यांनी रेपो दरात कपातीचा मुद्दा लावून धरला होता. यावेळी रेपो दरात वाढीची शक्यता नाही. पण त्यात कपात होईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काय आहे दावा पुन्हा किरकोळ आणि घाऊक महागाई दरात घसरण आल्यास ऑगस्ट महिन्यात आरबीआय रेपो दरात कपातीचा निर्णय घेऊ शकते. नोमुरा होल्डिंगसने याविषयीचा अंदाज यापूर्वीच वर्तविला आहे. रेपो दरात 2023 च्या अखेरीस 75 बेसीस पॉईंटची कपात होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. असे झाल्यास रेपो दर 6.50 टक्क्यांहून 5.75 टक्क्यांपर्यंत खाली घसरू शकतो.

कर्जदारांना होईल फायदा आरबीआय आता बँकांच्या मनमानीला लगाम घालणार आहे. त्यासाठी 12 पॉईंट्सचा एक नवीन प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावात दंडात्मक शुल्कावरील व्याज (Penal Charge) वर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. अनेक कर्जदारांनी बँकांच्या मनमानी विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आरबीआयने त्याविरोधात कडक पाऊल टाकले आहे. बँका, आर्थिक संस्था, कंपन्या आणि हाऊसिंग फायनान्स कंपन्या यांना आता या प्रस्तावावर मत मांडायचे आहे. 15 मे 2023 रोजीपर्यंत त्यांना सूचना द्यायच्या आहेत. जर हे नवीन नियम लागू झाले तर कर्जदारांना त्याचा थेट फायदा होईल.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.