Yuvraj singh : 40 व्या वाढदिवसादिवशी युवराजची मोठी घोषणा, घेऊन येणार NFT

NFT टोकन घेऊन येणाऱ्या सेलिब्रेटींच्या यादीत युवराज सिंह आता सामील झाला आहे. याची घोषणा त्याने ट्विटर आणि इन्स्ट्राग्रामवरून केली आहे.

Yuvraj singh : 40 व्या वाढदिवसादिवशी युवराजची मोठी घोषणा, घेऊन येणार NFT
Follow us
| Updated on: Dec 12, 2021 | 9:17 PM

क्रिकेटर युवराज सिंह नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आता त्याने एक मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे. युवराजने आपल्या 40 व्या वाढदिवसादिवशी NFT घेऊन येत असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे फॅन्ससाठी नववर्षाच्या तोंडावर हे मोठं गिफ्ट असणार आहे. त्यामुळे युवराजच्या चाहत्यांमध्ये याची उत्सुक्ता वाढली आहे.

नॉन फंजीबल टोकन असणाऱ्या सेलिब्रेटींच्या यादीत

NFT टोकन घेऊन येणाऱ्या सेलिब्रेटींच्या यादीत युवराज सिंह आता सामील झाला आहे. याची घोषणा त्याने ट्विटर आणि इन्स्ट्राग्रामवरून केली आहे. 2011 चा वर्ल्डकप जिंकण्यात युवराज सिंह याची अत्यंत महत्वाची भूमिका आहे. युवराजला 2011 च्या विश्वचषकात मॅन ऑफ सिरीज पुरस्कार मिळाला आहे. त्याची कामगिरी चमकदार होती. त्याला त्या विश्वचषकाचा हिरो मानले जाते, त्यामुळे युवराजची फॅनसंख्या मोठी आहे. त्यामुळेच युवराज आधीही काही ब्रँड त्याच्या फॅन्ससाठी आणि इतरांसाठी घेऊन आला आहे.

युवराजच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये काय?

युवराज सिंहने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, जेव्हापासून त्याने क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हाही फॅन्स नेहमी सोबत राहिले आहेत. चांगल्या वेळी मनोबल वाढवण्यासाठी आणि खराब वेळेत सोबत राहण्यासाठी सर्वांचे आभार. माझ्या वाढदिवसानिमित्त मी तुमच्यासाठी एका खास भेटीची घोषणा करतो आहे. त्याचबरोबर त्यांने एक प्रमोशनल व्हिडिओही ट्विट केला आहे.

25 डिसेंबरला कलेक्शन लॉन्च होणार

याचे कलेक्शन 25 डिसेंबरला Colexion वर लॉन्च होणार आहे. यावेळी अमिताफ बच्चन, रजनीकांत, सलमान खान, सनी लिओनी मनीष मलहोत्रा, हे सेलिब्रेटी सामील असणार आहेत. त्यामुळे शानदार लॉन्चिंग होणार आहे.

काय आहे Nft?

Nft (नॉन फंजीबल टोकन)) हा एकप्रकारचा डिजिटल अॅसेट असतो. याला ब्लॉकचेनवर रेकॉर्ड केले जाते. याच्यात तुम्ही इमेज, गेम, व्हिडिओ, ट्विट कोणत्याही Nft त बदलून मॅनेटाईज करू शकता. यातील डिजीटल अॅसेटला क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून खरेदी केले जाऊ शकते, विकले जाऊ शकते.

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.