Pune Shiv jayanti 2026 | शिवजयंतीनिमित्त शिवनेरी दुमदुमली; जल्लोष आणि उत्साहाला उधाण

Pune Shiv jayanti 2026 | शिवजयंतीनिमित्त शिवनेरी दुमदुमली; जल्लोष आणि उत्साहाला उधाण

| Updated on: Feb 19, 2026 | 11:30 AM

महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 396 वी जयंती आज राज्यभर मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. यानिमित्त ऐतिहासिक किल्ले शिवनेरी येथे शिवजयंतीचा विशेष उत्साह पाहायला मिळत आहे. शिवनेरी किल्ल्यावर असलेल्या महाराजांच्या पाळणाघराला राज्यभरातून शिवप्रेमी मोठ्या संख्येने भेट देत आहेत.

महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 396 वी जयंती आज राज्यभर मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. यानिमित्त ऐतिहासिक किल्ले शिवनेरी येथे शिवजयंतीचा विशेष उत्साह पाहायला मिळत आहे. शिवनेरी किल्ल्यावर असलेल्या महाराजांच्या पाळणाघराला राज्यभरातून शिवप्रेमी मोठ्या संख्येने भेट देत आहेत. आकर्षक आणि रंगीबेरंगी फुलांनी पाळणाघराची देखणी सजावट करण्यात आली असून मनमोहक असे दृश्य येथे अनुभवायला मिळत आहे. विविध रंगांच्या फुलांनी सजवलेला पाळणा भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही 19 फेब्रुवारी रोजी शिवनेरी किल्ल्यावर शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या ऐतिहासिक स्थळावर सोहळा पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून असंख्य शिवभक्त उपस्थित राहत आहेत. शिवजयंतीनिमित्त शिवनेरीवर भक्तिभाव, अभिमान आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Published on: Feb 19, 2026 11:30 AM