Sanjay Raut Full Press | AAP फुटीवर संजय राऊतांचा हल्लाबोल; ED कारवाईनंतर राजकीय भूकंप, भाजपवर गंभीर आरोप

| Updated on: Apr 25, 2026 | 11:45 AM

आम आदमी पार्टी (AAP) मधील फुटीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. आपचे काही खासदार भारतीय जनता पक्षात जाण्याच्या चर्चेमुळे राजधानीतील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमधून राज्यसभेवर गेलेले काही आप खासदार भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे.

आम आदमी पार्टी (AAP) मधील फुटीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. आपचे काही खासदार भारतीय जनता पक्षात जाण्याच्या चर्चेमुळे राजधानीतील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमधून राज्यसभेवर गेलेले काही आप खासदार भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे. यामध्ये राघव चड्ढा यांच्यासह इतर काही नावांचा उल्लेख केला जात आहे.
या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी भाजपवर टीका करत, “अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारताला ‘नरक’ का म्हणाले, हे आता समजतंय,” असा टोला लगावला. तसेच त्यांनी आरोप केला की, “भाजपने राजकारणात नैतिकता सोडली असून, विरोधकांवर दबाव टाकण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जातो.” राऊत यांनी पुढे सांगितलं की, काही खासदारांच्या संस्थांवर अंमलबजावणी संचालनालय (ED) कडून छापे टाकल्यानंतर राजकीय परिस्थितीत अचानक बदल झाला. “ED कारवाईनंतरच हा राजकीय भूकंप घडला,” असा दावा त्यांनी केला.
दरम्यान, या सर्व घडामोडींमुळे राष्ट्रीय राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असून, आगामी काळात आणखी काही पक्षांतर होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

Published on: Apr 25, 2026 11:45 AM
Follow Us