दिल्लीतील आंदोलनात अभिजीत दीपकेला अटक, आई-वडिलांचा संताप अनावर; थेट म्हणाले…
काँग्रेस कार्यकर्ते अभिजीत दीपके यांना ताब्यात घेतल्याप्रकरणी त्यांचे आई-वडील संतप्त झाले आहेत. वडील पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, तर आईने सरकारच्या कृतीचा निषेध करत, माझं लेकरु देशासाठी लढतंय, पण हे सरकार चांगलं नाही, अशी भावनिक प्रतिक्रिया दिली. दीपके यांच्या अटकेवर कुटुंबियांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
दिल्लीतील काँग्रेसच्या आंदोलनादरम्यान कार्यकर्ते अभिजीत दीपके यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या आई-वडिलांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अभिजीतच्या वडिलांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पोलिस हे गृहखात्याचे नोकर झालेले आहेत आणि ते विद्यार्थ्यांवर अन्याय करत आहेत, असे त्यांनी म्हटले. अमित शहा आणि मोदी हे गुजरात दंगलीतून तयार झालेले गुंड आहेत, अशी गंभीर टीकाही त्यांनी केली आहे.
अभिजीतच्या आईनेही सरकारच्या कारवाईवर जोरदार आक्षेप घेतला. सरकारने हे बरोबर केले नाही. तो देशासाठी काम करत होता, काही वाईट नाही, असे त्या म्हणाल्या. अरोपींना आणि चोरांना तात्काळ अटक केली जात नाही, पण देशासाठी काम करणाऱ्याला विमानातून उतरवून अटक केली जाते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हे सरकार चांगले नाहीये, ते तुला कधीही अटक करतील, अशी भीती त्यांनी अभिजीतला आधीच व्यक्त केली होती. तरीही मी देशाचा आहे, असे म्हणत अभिजीतने आंदोलनात भाग घेतला.
