दिल्लीत हालचाली वाढल्या! वकीलांसोबतच्या चर्चेत मोठा निर्णय? अभिजीत दीपकेच्या भेटीगाठी सुरुच

दिल्लीत हालचाली वाढल्या! वकीलांसोबतच्या चर्चेत मोठा निर्णय? अभिजीत दीपकेच्या भेटीगाठी सुरुच

| Updated on: Jul 27, 2026 | 1:04 PM

दिल्लीतील आंदोलनानंतर अभिजीत दिपके यांनी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांची भेट घेतली आहे. आंदोलनादरम्यान आंदोलकांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत चर्चा करण्यासाठी ही भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीमुळे या प्रकरणाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखालील कॉकरोच जनता पार्टीने नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीत आंदोलन केले होते. या आंदोलनात तत्कालीन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. आंदोलनादरम्यान संसदेकडे मोर्चा काढण्यात आला होता.

मोर्चादरम्यान आंदोलक आणि पोलिस यांच्यात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप करण्यात आला. तसेच या प्रकरणानंतर अनेक आंदोलकांवर विविध कलमांअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.

या पार्श्वभूमीवर अभिजीत दिपके यांनी काँग्रेसचे खासदार आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांची भेट घेतली. आंदोलकांवरील गुन्हे आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया यावर दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.

ही बैठक सुमारे 25 मिनिटे सुरू होती. या भेटीनंतर आंदोलनाशी संबंधित प्रकरणात पुढे कोणती कायदेशीर भूमिका घेतली जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 27, 2026 1:04 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us