निसर्गाचा चमत्कार! अजिंठा लेणीतील सप्तकुंड धबधाबा प्रवाहित

निसर्गाचा चमत्कार! अजिंठा लेणीतील सप्तकुंड धबधाबा प्रवाहित

| Updated on: Jul 08, 2026 | 2:54 PM

राज्यात सध्या मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अनेक कोरडे पडलेले धबधबे पुन्हा प्रवाहित झाले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजिंठा लेणी परिसरातील प्रसिद्ध सप्तकुंड धबधबा देखील आता पूर्ण क्षमतेने वाहू लागला आहे.

राज्यात सध्या मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अनेक कोरडे पडलेले धबधबे पुन्हा प्रवाहित झाले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजिंठा लेणी परिसरातील प्रसिद्ध सप्तकुंड धबधबा देखील आता पूर्ण क्षमतेने वाहू लागला आहे. डोंगरकड्यांमधून कोसळणाऱ्या पांढऱ्याशुभ्र पाण्याच्या धारा पर्यटकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या आहेत.

अजिंठा लेणी परिसरातील हिरवागार निसर्ग, धुक्याची चादर आणि त्यातून वाहणारा सप्तकुंड धबधबा यामुळे संपूर्ण परिसराला वेगळेच सौंदर्य प्राप्त झाले आहे. या मनमोहक दृश्याचे व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. निसर्गप्रेमी आणि पर्यटकांसाठी हे ठिकाण आकर्षणाचे केंद्र बनले आहे.

दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना आणि पर्यटकांना धबधब्याजवळ जाताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Published on: Jul 08, 2026 2:54 PM
Follow Us