Baramati | बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया
बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, “बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर महाराष्ट्र सुसंस्कृतपणे निर्णय घेईल. पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसंदर्भात घोषणा होणार आहेत.
बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, “बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर महाराष्ट्र सुसंस्कृतपणे निर्णय घेईल. पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसंदर्भात घोषणा होणार आहेत. या प्रक्रियेत हस्तक्षेप थांबवला जावा, अशी अपेक्षा आहे.” दानवे म्हणाले की, बारामती आणि राहुरी ही अनुक्रमे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या रिक्त जागा आहेत. परंतु या सर्व प्रक्रियेदरम्यान भारतीय जनता पक्ष इथे देखील मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप करीत आहे. “निवडणुकीच्या घोषणांमध्ये, उद्घाटनांमध्ये सर्व मंत्री हस्तक्षेप करतात, हे थांबवण्याचा प्रयत्न व्हावा,” अशी अपेक्षा दानवे यांनी व्यक्त केली.
Published on: Mar 15, 2026 03:33 PM
Follow Us
