अमित शहांनी खरंच एकनाथ खडसेंना कॉल केला होता? भाजप नेत्यांची प्रतिक्रिया तुफान चर्चेत

अमित शहांनी खरंच एकनाथ खडसेंना कॉल केला होता? भाजप नेत्यांची प्रतिक्रिया तुफान चर्चेत

| Updated on: Jul 12, 2026 | 1:37 PM

राज्यात अचानक मुख्यमंत्री पदाच्या चर्चांना वेग आला आहे. देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जाणार असल्याचा दावा उद्धव ठाकरे गोटातून करण्यात आला. फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे पुढचे मुख्यमंत्री असतील असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला होता.

राज्यात अचानक मुख्यमंत्री पदाच्या चर्चांना वेग आला आहे. देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जाणार असल्याचा दावा उद्धव ठाकरे गोटातून करण्यात आला. फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे पुढचे मुख्यमंत्री असतील असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला होता. तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याचा दावा करून खळबळ उडवून दिली होती. आता या सर्व चर्चांवर खुद्द गिरीश महाजन यांनीच मोठा खुलासा केला आहे.

या सर्व दाव्यांवर गिरीश महाजन यांनी माध्यमांना खास प्रतिक्रिया दिली. “मी कधीच मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नव्हतो आणि असणारही नाही, असे म्हणत त्यांनी विषयावर एका वाक्यात पडदा टाकला. यानंतर महाजनांनी मोठा दावा केला की, त्यांची (विरोधी पक्षाची) सत्ता असताना खडसेंनी स्वतःच सांगितलंय मी मुख्यंमंत्री होणार… मी मुख्यमंत्री होणार… पुढे गिरीश महाजन म्हणाले, “त्यांना अमित शाह यांनी फोन केला की नाही हे त्यांचं त्यांनाच माहीत. मला माहीत नाही. त्यांची थेट हॉट लाईन असेल. ते मागे तसं म्हणालेही होते आमची दिल्लीला हॉट लाईन आहे वगैरे, असा चिमटा त्यांनी एकनाथ खडसे यांना काढला.”

संजय राऊतांच्या वक्तव्यांवर बोलताना ते म्हणाले, “त्यांना फार उत्तर देण्याची गरज नाही. त्यांच्या जिभेला हाड नाही मनुफॅक्चरिंग फॉल्ट आहे, असा टोला महाजन यांनी लगावला. कुंभमेळ्यात नाशिकमध्ये कोणते गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर दिसत आहे तुम्ही तर शोधून द्या काहीतरी बोलतात. स्वतः काही बोंब पडत नाही आपल्या मागे आता कोणी राहिले नाही आपण काय केले एखादा काम त्यांचं सांगण्यासारखे आहे का काहीच नाही. कुणालाही काही बोलतात पंतप्रधानांपासून सरन्यायाधीशांपासून इलेक्शन कमिशन, फडणवीस आणि शिंदे यांना वाटेल ते बोलत असतात हा एकच गुणधर्म त्यांचा आहे. “

Published on: Jul 12, 2026 1:27 PM
Follow Us