Ladki Bahin Yojana : ‘लाडक्या बहिणी’च्या 1500 रूपयांवरून भिडले, विजय वडेट्टीवारांनी काढला रवी राणांचा बाप

Ladki Bahin Yojana : ‘लाडक्या बहिणी’च्या 1500 रूपयांवरून भिडले, विजय वडेट्टीवारांनी काढला रवी राणांचा बाप

Harshada Shinkar | Updated on: Aug 12, 2024 | 5:29 PM

मताची झाली कडकी म्हणून बहीण आठवली लाडकी, असे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारला खोचक टोला लगावला आहे. रवी राणा यांनी लाडकी बहीण योजनेच्या प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात एक वक्तव्य केले होते. यावर वडेट्टीवारांनी भाष्य करत जोरदार निशाणा साधला आहे.

आशीर्वाद दिला नाहीतर खात्यातून १५०० रूपये परत घेणार, असं वक्तव्य अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी केलं आहे. अमरावतीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रमाणपत्र वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमात रवी राणांनी हे वक्तव्य केले आहे. रवी राणा यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी त्यावर भाष्य केले आहे. सरकारी पैसा रवी राणा यांच्या बापाचा आहे का? असा सवालच विजय वडेट्टीवार यांनी रवी राणा यांना केला आहे. महिलांना दिलेला पैसा यांच्या बापाचा आहे का? लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना दिला जाणारा पैसा रवी राणांच्या कमाईचा आहे का? की या राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याचा तो पैसा आहे? रवी राणा बेईमान माणूस आहे. बहिणीला फसवणारा माणूस आहे. रवी राणा महायुती सरकारच्या मनातील बोलला ही योजना फक्त मतांसाठी आहे, असे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

Published on: Aug 12, 2024 5:29 PM
Follow Us