AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anjali Damania : वाह फडणवीस... असा काय नाईलाज, मला कळंल तेव्हा... भुजबळांच्या शपथविधीवरून दमानियांचा संताप

Anjali Damania : वाह फडणवीस… असा काय नाईलाज, मला कळंल तेव्हा… भुजबळांच्या शपथविधीवरून दमानियांचा संताप

| Updated on: May 20, 2025 | 12:20 PM

छगन भुजबळ मंत्री म्हणून शपथ घेत आहेत हे मला कळालं तेव्हा असच अस्वस्थ वाटलं. मला खूप राग आला, असं कसं एक भ्रष्ट मंत्री गेला तर त्याच्या जागेवर दुसरा भ्रष्ट मंत्री आपल्या डोक्यावरती थोपवला जात आहे..अशी प्रतिक्रिया आज अंजली दमानिया यांनी माध्यमांना दिली.

एक भ्रष्ट मंत्री गेल्यावर दुसरा भ्रष्ट मंत्री थोपवला, अशा शब्दात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी छगन भुजबळ यांच्या मंत्रिपदाच्या शपथविधीवर प्रतिक्रिया दिली आहे. महायुती सरकार सत्तेत आल्यावर भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर भुजबळ हे नाराज होते. मात्र आता ही नाराजी दूर झाल्याची चर्चा आहे. भुजबळांच्या शपथविधीच्या आधी अंजली दमानिया यांनी एक ट्विट करत भाजप आणि महायुती सरकारला खडा सवाल केला होता. ‘वाह फडणवीस वाह ! म्हणजे एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री येणार? जनता अशीच भरडली जाणार? की हा माझ्यासारख्या भ्रष्टाचार विरोधी लढणाऱ्यांना संदेश आहे, की तुम्ही आमच काहीच वाकड करू शकत नाही? असा काय नाईलाज आहे ? की सभ्य माणसं मिळत नाहीत राजकारणात? अशी प्रश्नांची सरबत्ती करत त्यांनी मोठा धुराळा उडवून दिला.’, असं ट्विटमध्ये म्हटलं होतं यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना तेच म्हटलं आणि भुजबळांच्या मंत्रिदावरून टीकास्त्र डागलं आहे.

 

Published on: May 20, 2025 11:50 AM