Anjali Damania : मंत्री जयकुमार गोरेंच्या विरोधात अंजली दमानिया आक्रमक
Minister Jaykumar Gore News : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचं व्हाटसअपवर महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचं प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. त्यामुळे विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील आता आक्रमक भूमिका घेतली आहे.
जयकुमार गोरे यांच्यासारख्या व्यक्तीला मंत्रीमंडळातून काढून टाकलं पाहिजे, असं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हंटलं आहे. पीडित महिलेसोबत राज्यपालांना भेटायला जाणार असल्याचं देखील दमानिया यांनी म्हंटलं आहे. गोरे यांच्यासारख्या विकृत व्यक्तींना मंत्रिमंडळात स्थान देऊ नका अशी भूमिका अंजली दमानिया यांनी घेतली आहे.
धनंजय मुंडे यांच्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे अडचणीत येण्याची शक्यता आहे. जयकुमार गोरे 2016 मध्ये आमदार असताना एका महिलेला त्रास दिला होता. व्हाटसअपवर त्या महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचं प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. गोरे यांचं हे जुनं प्रकरण समोर आल्यानं आता विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जयकुमार गोरे यांना बडतर्फ करण्यासाठी त्या पीडित महिलेसोबत राज्यपालांकडे जाणार असल्याचं म्हटलं आहे.