Pandharpur | आषाढी वारीत सायकल वारीची धूम! तब्बल 7 हजार सायकलवरून पंढरी गाठणाऱ्या वारकऱ्यांचा उत्साह पाहाच

Pandharpur | आषाढी वारीत सायकल वारीची धूम! तब्बल 7 हजार सायकलवरून पंढरी गाठणाऱ्या वारकऱ्यांचा उत्साह पाहाच

| Updated on: Jul 12, 2026 | 4:42 PM

आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने विठुरायाच्या भेटीसाठी मार्गस्थ झाले असताना, यंदा सायकल वारी विशेष आकर्षण ठरत आहे. पर्यावरणपूरक संदेश आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देत हजारो सायकलस्वार वारकरी विठ्ठलनामाचा गजर करत पंढरीत दाखल झाले आहेत.

पंढरपूर सायकल क्लबच्या वतीने सलग सातव्या वर्षी सायकल वारीचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे, मुंबई, लातूर, नांदेड, जळगावसह विविध जिल्ह्यांतील वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील विविध भागांतून जवळपास ७ हजार सायकलस्वार वारकरी पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाची ओढ, हरिनामाचा गजर आणि भक्तीभावाने सजलेली ही सायकल वारी भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.

दरम्यान, पारंपरिक वारीसोबत आधुनिक पद्धतीने साजरी होत असलेली ही सायकल वारी पर्यावरण संवर्धन, आरोग्य आणि भक्तीचा अनोखा संगम ठरत असून, पंढरपूरच्या वारीला यंदा एक वेगळीच रंगत प्राप्त झाली आहे.

Published on: Jul 12, 2026 4:42 PM
Follow Us