VIDEO : NSA Ajit Doval यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न,सुरक्षा रक्षकांनी संशयिताला ताब्यात घेतलं
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या घरात एकानं घुसण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही बाब लक्षात येताच सुरक्षारक्षकांनी तातडीनं घरात घुसणाऱ्या अज्ञात व्यक्तीला तातडीनं ताब्यात घेतलं आहे. सध्या दिल्ली पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीची चौकशी सुरु आहे.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या घरात एकानं घुसण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही बाब लक्षात येताच सुरक्षारक्षकांनी तातडीनं घरात घुसणाऱ्या अज्ञात व्यक्तीला तातडीनं ताब्यात घेतलं आहे. सध्या दिल्ली पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीची चौकशी सुरु आहे. नेमका हा व्यक्ती कोण आहे? त्यानं नेमकं असं का केलं, याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही. हा व्यक्ती कर्नाटकच्या बंगळुरुतील राहाणार असल्याचं वृत्त आजतकनं दिलं आहे. दिल्ली पोलिसांचं दहशतवादविरोधी पथक या व्यक्तीची चौकशी करते आहे. दिल्लीतील लोधी कॉलनीत असलेल्या स्पेशल सेलच्या ऑफिसात या व्यक्तीची कसून चौकशी सुरु आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
