चांदीच्या पानावर सोन्याची अक्षरं! एकनाथ शिंदेंचं नाव सुवर्णाक्षरात का कोरलं जाणार?
अविमुक्तेश्वरानंद महाराज यांनी एक मोठा निर्णय घेतला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव सुवर्णाक्षरात कोरलं जाणार आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गायीला ‘राज्यमाता’ म्हणून घोषित केल्याच्या निर्णयाचे अविमुक्तेश्वरानंद महाराज यांनी कौतुक केले आहे. त्यांनी जाहीर केले की, शिंदे यांचे नाव चांदीच्या पानांवर सुवर्णाक्षरांनी कोरले जाईल. महाराज म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी गायीला राज्यमाता म्हणून सन्मान दिला, म्हणून आम्ही त्यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिण्याचा निर्णय घेतला आहे. जर दुसऱ्या कोण्या मुख्यमंत्र्याने असेच कार्य केले, तर त्यांचाही विचार केला जाईल. जे विरोध करतात, त्यांना विरोध करू द्या, पण काम करणाऱ्यांचेच नाव इतिहासात नोंदवले जाते, असे त्यांनी सांगितले.
यावेळी अविमुक्तेश्वरानंद महाराजांनी राज ठाकरे यांच्या सभेवर देखील भाष्य केलं. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या सामनामधील मुलाखतीवर देखील प्रतिक्रिया दिली. शिवसेना हा बाळासाहेब ठाकरेंचा विचार होता. तो या मातीतून त्यांना मिळाला. त्यामुळे शिवसेनेचे कितीही तुकडे झाले तरी ती शिवसेनाच राहणार आहे, खरी खोटी असं काहीही नाही, असं मत अविमुक्तेश्वरानंद महाराजांनी यावर व्यक्त केलं.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

