India Pakistan War : नाहीतर आणखी हल्ले करू, बलुचिस्तानकडून पाकिस्तान अन् चीनला उघड धमकी, VIDEO शेअर करत वाढवलं टेन्शन
ऑपरेशन सिंदूर अतंर्गत भारताने पाकिस्तानातील ९ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करत त्यांना उद्ध्वस्त केलं. यानंतर बलुचिस्तान आक्रमक झाला असून बलुचिस्तान म्हणजे पाकिस्तान नाही असे म्हणत बलुच नागरिक रस्त्यावर उतरत त्यांनी पाकिस्तानचा झेंडा उतरवत स्वतःचा वेगळा झेंडा हाती घेतला आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावादरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे. बलुचिस्तान सैनिकांकडून पाकिस्तान आणि चीनला धमकी देण्यात आली आहे. बीआरआय प्रोजेक्टचं काम बंद करा अन्यथा हल्ला करू, अशी थेट धमकीच बलुचिस्तान सैनिकांकडून पाकिस्तान आणि चीनला दिली आहे. इतकंच नाहीतर ग्वादर पोर्टला चीन आणि पाकिस्तानला हात लावू देणार नसल्याचेही बलुचिस्तानने ही धमकी देताना म्हटलं आहे. पाकिस्तानने बलुचिस्तानमधून सैनिक काढले नाही तर अजून हल्ला करू असा इशाराही बलुचिस्तान आर्मीकडून पाकिस्तानला देण्यात आला आहे.
भारत आणि पाकिस्तानात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे बलुचिस्तान देखील स्वातंत्र्यासाठी आक्रमक झाला आहे. बलुचिस्तान लिब्रेशन आर्मीने पाकिस्तानवर हल्ले करत त्यांना सळो की पळो असे केले आहे. अशातच बलुचिस्तान आर्मीने एक तृतीयांश भागावर ताबा घेतल्याचा दावा केला जात असल्याची माहिती मिळतेय.
Published on: May 10, 2025 01:03 PM
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
