Baramati- Rahuri Bypoll Elections Result | बारामतीत सुनेत्रा पवारांचा झंझावात तर राहुरीत कर्डिलेची भक्कम आघाडी
महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकांच्या मतमोजणीला वेग आला असून, सुरुवातीच्या फेऱ्यांमध्येच आघाडीचे स्पष्ट चित्र समोर येऊ लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती मतदारसंघात एकूण 23 उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, मतमोजणीच्या सुरुवातीलाच सुनेत्रा पवार यांनी मोठी आघाडी घेत विरोधकांना मागे टाकले आहे.
महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकांच्या मतमोजणीला वेग आला असून, सुरुवातीच्या फेऱ्यांमध्येच आघाडीचे स्पष्ट चित्र समोर येऊ लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती मतदारसंघात एकूण 23 उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, मतमोजणीच्या सुरुवातीलाच सुनेत्रा पवार यांनी मोठी आघाडी घेत विरोधकांना मागे टाकले आहे. सध्या त्या तब्बल 36,591 मतांनी आघाडीवर आहेत.
दरम्यान, भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे राहुरी येथे पोटनिवडणूक होत असून, येथे भाजपचे अक्षय कर्डिले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे गोविंद मोकाटे यांच्यात मुख्य लढत आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार अक्षय कर्डिले यांनी 18,123 मतांची भक्कम आघाडी घेतली आहे.
दोन्ही मतदारसंघांतील निकालांकडे राज्याचे लक्ष लागले असून, पुढील फेऱ्यांमध्ये ही आघाडी कितपत कायम राहते याबाबत उत्सुकता वाढली आहे.
