Sandeep Kshirsagar : बीड विनयभंग प्रकरणी मुंडेंच्या आरोपांवर क्षीरसागर स्पष्टच म्हणाले, लवकरच….
'धनंजय मुंडे सत्तेत आहेत. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस सत्तेत आहेत. अजित पवार बीडचे पालकमंत्री आहेत. हे सगळे सत्तेत असताना तुम्ही अशा प्रकरणात नेत्यांची चौकशी केली पाहिजे. अजित पवार यांचा स्वभाव असा आहे की, जे दोषी असतील त्यांच्यावर ते कारवाई करतील', असं म्हणत क्षीरसागर यांनी मुंडेंकडून होणाऱ्या आरोपांवर भाष्य केले आहे.
बीड शहरातील खासगी क्लासमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोन शिक्षकांवर गुन्हा नोंद करण्यात आला. त्यांना अटक केल्यानंतर काल बीड न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यासंदर्भात आमदार धनंजय मुंडेंनी पत्रकार परिषद घेऊन आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केले. गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर हे आरोपी सोबत होते. त्यांचे सीडीआर काढा आणि एसआयटी मार्फत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी मुंडेंनी केली. दरम्यान, यावरच संदीप क्षीरसागर यांनी आपली भूमिका व्यक्त केली आहे. ‘बीड विनयभंग प्रकरणातील आरोपींना दुसऱ्या दिवशी अटक झाली. धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला त्याचं त्यांना दुःख आहे. लवकरच दूध का दूध और पानी का पानी होईल.’, असं टीका करताना क्षीरसागर यांनी म्हटलय.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी

