बीड पुन्हा हादरलं… लोखंडी रॉड अन् धारदार शस्त्र; आष्टीत दोन सख्या भावांची निर्घृण हत्या, कारण नेमकं काय?

बीड पुन्हा हादरलं… लोखंडी रॉड अन् धारदार शस्त्र; आष्टीत दोन सख्या भावांची निर्घृण हत्या, कारण नेमकं काय?

Harshada Shinkar | Updated on: Jan 17, 2025 | 9:22 PM

आष्टी तालुक्यात वाहिरा परिसरात दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं आष्टी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. कारण नेमकं काय?

बीड पुन्हा एकदा हादरल्याचे समोर आले आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात दोन सख्ख्या अन् रक्ताच्या भावंडाची हत्या करण्यात आली. तर अंबाजोगाईमध्ये ही गोळीबाराची घटना घडली आहे. आष्टी तालुक्यात वाहिरा परिसरात दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं आष्टी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. अजय आणि भरत भोसले असे हत्या करण्यात आलेल्या सख्या भावांची नावं आहेत. त्यांच्यात समाजातील काही लोकांनी लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्राने अजय आणि भरत भोसले या दोघांवर जोरदार हल्ला केल्याची माहिती मिळतेय. तर या हल्ल्यात कृष्णा भोसले गंभीर जखमी असून त्यांच्यावर सध्या अहिल्यानगरच्या ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहे. हे तिघेही गावात उभे असताना गावातील आणि गावाबाहेरील काही लोकं तिथे आलेत. त्यातील काही लोकांनी तिघांवर हल्ला केला. तर संशयित आरोपींना पोलिसांना ताब्यात घेतलंय. बघा पोलिसांनी काय दिली माहिती? हत्या करण्याचं कारण काय?

Published on: Jan 17, 2025 9:22 PM
Follow Us