Bilawal Bhutto : अब पाकिस्तान का जवाब… पाकमध्ये घुसून मारल्यानंतर बिलावल भुट्टोचा तिळपापड, ऑपरेशन सिंदूरनंतर पुन्हा बडबडला
ऑपरेशन सिंदूरनंतर बिलावल भुट्टो यांनी आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी घाबरलेल्या पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) चे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी भारताला पुन्हा पोकळ धमकी दिलीये
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. घाबरलेल्या पाकिस्तानी नेत्यांनी भारताविरुद्ध विषारी वक्तव्य करण्यास सुरुवात केली असून भारताला पुन्हा पोकळ धमक्या देणं सुरू केले आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या तोंडचं पाणी पळवलं. भारताच्या हातून आपल्या दहशतवादी अड्ड्यांचा नाश झाल्याचे पाहून पाकिस्तान घाबरला आहे. भारताच्या हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) चे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी दहशतवादाविरुद्ध भारताच्या लष्करी कारवाईवर विष ओकले आहे. बिलावल यांनी भारताच्या पाकिस्तान आणि पीओकेमध्ये घुसून दहशतवादी लाँचपॅड नष्ट करण्याच्या कृतीला भ्याडपणाचे कृत्य म्हटले आहे. भुट्टोनं असंही म्हटलं की, पाकिस्तानला हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा पूर्ण अधिकार आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून पाकिस्तानला भारत सरकारकडून सतत आक्रमक धमक्या मिळत आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या (UN) नियमांनुसार पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे म्हणत भारताला पोकळ धमकी दिली आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

