अजित दादांसाठी कार्यकर्त्यांचा खास केक अन् राज्यात केकवरील ‘त्या’ मजकुराची एकच चर्चा, बघा व्हिडीओ

| Updated on: Jul 22, 2024 | 11:55 AM

अजित पवार यांच्या समर्थकांनी वाढदिवसासाठी आणलेल्या एका केकची राज्यात चांगलीत चर्चा होतेय. समर्थकांनी वाढदिवसाच्या दिवशी आणलेल्या केकवर जो मजकूर लिहिण्यात आला होता. त्यांची एकच चर्चा होतेय. इतकंच नाहीतर विरोधकांनी यावरून अजित पवार यांना खोचक टोला लगावला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नुकताच वाढदिवस साजरा करण्यात आला. मात्र या वाढदिवसासाठी अजित पवार यांच्या समर्थकांनी आणलेल्या एका केकची राज्यात चांगलीत चर्चा होतेय. समर्थकांनी वाढदिवसाच्या दिवशी आणलेल्या केकवर जो मजकूर लिहिण्यात आला होता. त्यांची एकच चर्चा होतेय. इतकंच नाहीतर विरोधकांनी यावरून अजित पवार यांना खोचक टोला लगावला आहे. समर्थकांनी अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आणलेल्या केकवर… ‘मी अजित आशा अनंतराव पवार महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…’, असा मजकूर लिहिला असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, आपल्या नेत्यानं मुख्यमंत्री व्हावं, अशी भावना पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्यांची असते. त्यामुळे सिरीअर होण्याचं कोणतंही कारण नसल्याचे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले. इतकंच नाहीतर भविष्यात दादा मुख्यमंत्री झाल्यास त्याचा आनंद सर्वांना होणार असल्याचेही संजय शिरसाट म्हणाले.

Published on: Jul 22, 2024 11:55 AM