अशोक चव्हाण यांच्यानंतर एकनाथ खडसेही भाजपात येणार? भाजपच्या मंत्र्यांचा मोठा दावा काय?
काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा खुलासा केलाय. काँग्रेसला रामराम केल्यानंतर आज अखेर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे अशोक चव्हाण यांनी भाजपच्या पक्षप्रवेशापूर्वी म्हटले. मात्र आता भाजप नेते आणि मंत्र्यांनं एक मोठा दावा केला आहे.
मुंबई, १३ फेब्रुवारी २०२४ : काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा खुलासा केलाय. गेल्या काही दिवसांपासून अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा चांगल्याच जोर धरताना पाहायला मिळत होत्या. मात्र काँग्रेसला रामराम केल्यानंतर आज अखेर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे अशोक चव्हाण यांनी भाजपच्या पक्षप्रवेशापूर्वी म्हटले. मात्र आता भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी मोठा दावा केला आहे. भाजपमध्ये येण्यासाठी एकनाथ खडसे यांचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर यासगळ्याची माहिती राज्याकडून आणि दिल्लीकडून मिळाल्याचे गिरीश महाजन यांनी म्हटलं. मात्र मला याबाबत कोणतीही विचारणा करण्यात आली नाही तर तसा प्रकारचं प्रयोजन देखील कुठं झालेलं नाही. एकनाथ खडसे यांना घ्यायचं की नाही? याबाबत मला कुणी विचारलं नाही कारण मी छोटा कार्यकर्ता आहे. वरून जर सिग्नल मिळाला तर मग काय ठीक आहे, असेही महाजन म्हणाले.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक

