Rohit Pawar On BJP : ‘यूज अँड थ्रो’ ही भाजपाची प्रवृत्ती, रोहित पवारांचा थेट हल्लाबोल
अण्णा हजारेंच्या भूमिकेनंतर रोहित पवार यांनी भाजपवर हा निशाणा साधला आहे. इतकंच नाहीतर ‘भाजप हा पक्ष लोकनेत्यांना संपवतो’ हे आम्ही पहिल्यापासून सांगतोय, असे म्हणत त्यांनी सडकून टीकाही भाजपवर केली आहे. यूज अँड थ्रो ही भाजपाची प्रवृत्ती असून त्यानुसारच ते आज अजितदादांसोबत वागत आहेत, हा क्लिअर मेसेज आहे., असे रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले.
यूज अँड थ्रो ही भाजपाची प्रवृत्ती, अशी टीका शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली. अण्णा हजारेंच्या भूमिकेनंतर रोहित पवार यांनी भाजपवर हा निशाणा साधला आहे. इतकंच नाहीतर ‘भाजप हा पक्ष लोकनेत्यांना संपवतो’ हे आम्ही पहिल्यापासून सांगतोय, असे म्हणत त्यांनी सडकून टीकाही भाजपवर केली आहे. ट्विट करत रोहित पवार म्हणाले, अजितदादांमुळं भाजपाने स्वतःची ब्रॅण्ड व्हॅल्यू संपवल्याची आधी ऑर्गनायझरमधून झालेली टीका… नंतर दहा वर्षे शांत झोपलेल्या कथित गांधींनी अचानक जागे होऊन शिखर बँक प्रकरणी अजितदादांच्या क्लिन चिट विरोधात न्यायालयात जाण्याची घेतलेली भूमिका.. आणि काल राज्यसभेचा अर्ज भरताना एकाही भाजपेयीची नसलेली उपस्थिती हा घटनाक्रम लक्षात घ्या.. यूज अँड थ्रो ही भाजपाची प्रवृत्ती असून त्यानुसारच ते आज अजितदादांसोबत वागत आहेत, हा क्लिअर मेसेज आहे., असे रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले.