MIDC | सर्वत्र धुकं पसरलं अन् विचित्र असा वास… एमआयडीसीत भीषण कार्बन डायऑक्साइड गॅस गळती
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज एमआयडीसी परिसरात कार्बन डायऑक्साइड गॅस गळतीची घटना घडल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. एका कार्गो कंपनीकडून उपकरणांमध्ये कार्बन डायऑक्साइड गॅस भरण्याचे काम सुरू असताना अचानक ही दुर्घटना घडली.

गॅस गळती होताच परिसरात मोठ्या प्रमाणात धुरासारखा पांढरा थर पसरला अन् विचित्र असा वास येऊ लागला होता. त्यामुळे काही वेळासाठी कर्मचाऱ्यांमध्ये आणि स्थानिकांमध्ये भीती पसरली. घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसीतील अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्वरित नियंत्रणाची उपाययोजना सुरू केली. काही वेळातच गॅस गळतीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नाही तसेच कोणालाही गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
या घटनेनंतर परिसरातील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत असून संबंधित यंत्रणांकडून घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे.