Mumbai | मुंबईत टोकियोचा नजारा; इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर चेरी ब्लॉसम फुलांचा बहर
जपानमधील टोकियो आणि इतर शहरांमध्ये पाहायला मिळणाऱ्या चेरी ब्लॉसमच्या मनमोहक फुलांचा नजारा आता थेट मुंबईत अनुभवायला मिळत आहे. मुंबईच्या इस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या कडेला फेब्रुवारी महिना उजाडताच चेरी ब्लॉसमची झाडं फुलांनी बहरून निघाली असून, येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांचे लक्ष वेधून घेत आहेत. गुलाबी आणि पांढऱ्या रंगाच्या या अत्यंत आकर्षक फुलांमुळे संपूर्ण परिसराला एक वेगळंच, रम्य स्वरूप प्राप्त झालं आहे.

या फुलांच्या बहरामुळे इस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाच्या नजरेत हा नजारा भरून येत आहे. विशेषतः सकाळच्या वेळेस जॉगिंग, मॉर्निंग वॉकसाठी येणारे नागरिक येथे काही क्षण थांबून या सुंदर दृश्याचा आनंद घेताना दिसतात. अनेकजण मोबाईल आणि कॅमेऱ्यांमध्ये या फुलांच्या सौंदर्याला कैद करत आहेत.
फेब्रुवारी महिन्यापासून पुढे दीड ते दोन महिने ही चेरी ब्लॉसमची फुलं राहतात. या काळात हायवेचा परिसर अक्षरशः गुलाबी छटांनी सजून जातो. दरवर्षी फोटोग्राफर आणि पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. मुंबईसारख्या धावपळीच्या महानगरात अशा प्रकारचा निसर्गरम्य आणि शांत अनुभव मिळणं नागरिकांसाठी दिलासादायक ठरत आहे.